दुबई IND Beat PAK by 6 Wickets : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. क्रिडा जगतातील सर्वात मोठ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं दिलेल्या 242 धावांचं लक्ष्य भारतानं चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक 95 धावा केल्या.
भारताला 242 धावांची गरज :पाकिस्ताननं दिलेल्या 242 धावांचं पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीनं रोहितला (20) बोल्ड करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर टीम इंडियाचा उपकर्णधार गिलनं आक्रमक फटके मारले. यादरम्यान 14व्या षटकात चौकार मारत विराट कोहलीनं वनडेत 14000 धावांचा पल्ला गाठला. गिल आणि कोहली यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच 18व्या षटकात अबरार अहमदनं गिलला बाद करत ही जोडी तोडली. विराटनं 27व्या षटकात आपलं अर्धशतक पुर्ण केलं. त्यानंतर अय्यरनंही त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र यानंतर तो आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाला. भारताच्या आता 220हून अधिक धावा झाल्या असून चार विकेट गेल्या आहेत.
हार्दिकनं घेतली पहिली विकेट :या सामन्यात नाणेफेक जिंकत पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सौद शकील (62), मोहम्मद रिझवान (46) आणि शेवटच्या षटकात खुशदिल शाहनं (38) केलेल्या आक्रमक खेळीनं पाकिस्तानला 241 धावांचा आकडा गाठता आला. भारताकडून कुलदीपनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर शमीला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. आता भारताला सामना जिंकण्यासाठी 242 धावांची आवश्यकता आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित आहे.
रोहित शर्मानं पाकिस्तानविरुद्ध खेळली चाल : 2023 च्या वनडे विश्वचषकानंतर इमाम उल हक पाकिस्तानी संघासोबत वनडे सामना खेळणार आहे. इमाम व्यतिरिक्त, पाकिस्तान संघातील उर्वरित खेळाडू तेच आहेत जे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसले होते. भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी त्यांच्या विजयी संघासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.