महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नितीश कुमारचं 'रेकॉर्ड ब्रेक' शतक... बाहुबली आणि पुष्पा स्टाईलनं केलं सेलिब्रेशन - NITISH KUMAR REDDY RECORDS

नितीश रेड्डीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात शानदार फलंदाजी करत उत्कृष्ट शतक झळकावलं आहे. यासह त्यानं एक मोठा विक्रम केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 28, 2024, 12:51 PM IST

मेलबर्न Nitish Kumar Reddy Records : भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात कठीण काळात शानदार खेळी खेळली आणि शतक झळकावलं. नितीशनं पर्थ कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. तो ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्येही खेळला आणि तीन वेळा अर्धशतकाच्या जवळ आला. पण मेलबर्न क्रिकेट मैदानावर नितीशनं आपलं अर्धशतकही पूर्ण केलं आणि त्याचं शतकात रुपांतर करण्यात यश आलं.

निवडक खेळाडूंच्या यादीत स्थान : या शतकी खेळीसह नितीश निवडक फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांनी आपलं पहिलं कसोटी अर्धशतक शतकात रुपांतरित केलं आहे. या यादीत अनेक दिग्गजांची नावं आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आपल्या पहिल्याच कसोटीत ही कामगिरी केली होती. या यादीत शिखर धवनचाही समावेश आहे. भारताचा आणखी एक माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, सुरेश रैना, प्रवीण आमरे या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

तिसरा युवा फलंदाज :यासह नितीश ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा भारताचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या 21 वर्षे 216 दिवसात त्यानं हे काम केलं. या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर नाव आहे सचिन तेंडुलकरचं, ज्यानं 1992 मध्ये वयाच्या 18 वर्षे 256 दिवसांत हे काम केलं होतं. त्याच्यानंतर पंत आहे ज्यानं 2019 मध्ये सिडनी इथं वयाच्या 21 वर्षे 92 दिवसांत शतक केलं होतं.

सुंदरसोबत विक्रमी भागीदारी : नितीशनं वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं एमसीजीमध्ये भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांच्या प्रचंड धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतानं केवळ 221 धावांतच सात विकेट गमावल्या. येथून भारतीय संघ लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतेल, असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. नितीश आणि सुंदरनं खेळपट्टीवर आपले पाय रोवले आणि भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं. या दोघांनी शतकी भागीदारी करुन संघाला मजबूत स्थितीत आणलं आणि यजमान संघासमोर अडचणी निर्माण केल्या. भारताच्या आठव्या क्रमांकाच्या आणि नवव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीवर 50 हून अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. या दोघांच्या आधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगनं 2008 मध्ये ॲडलेडमध्ये अशी कामगिरी केली होती.

हेही वाचा :

  1. फायर नाही वाइल्डफायर... MCG वर नितीश कुमारचं ऐतिहासिक शतक; केलं 'पुष्पाभाई' सेलिब्रेशन
  2. SA vs PAK 1st Test: डेब्यू कसोटीत गोलंदाजानं फलंदाजीत केला वर्ल्ड रेकॉर्ड

ABOUT THE AUTHOR

...view details