महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'मुंबई'कर एजाज पटेलसमोर 'रोहित'सेनेची शरणागती; 92 वर्षाच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा दिवस - NEW ZEALAND WHITEWASH INDIA

न्यूझीलंड क्रिकेन संघानं भारताचा तिसऱ्या कसोटीत पराभव करत इतिहास रचला आहे. त्यांनी भारतात पहिल्यांदाच मालिका जिंकत भारताचा व्हाईट वॉश केला आहे.

new zealand whitewash india
न्यूझीलंड क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 3, 2024, 1:04 PM IST

Updated : Nov 3, 2024, 1:33 PM IST

मुंबई New Zealand Whitewash India : न्यूझीलंड क्रिकेट संघानं मुंबईत भारताचा दारुण पराभव पत्करावा लागला आहे. त्यांनी तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा 25 धावांनी पराभव करत मालिका 3-0 अशी जिंकली. दुसरीकडे, भारतीय संघाला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर व्हाईट वॉश मिळाला आहे. न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात भारतासमोर 147 धावांचं लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग भारतीय संघ करु शकला नाही. वानखेडेवर एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या धोकादायक गोलंदाजीसमोर एकही भारतीय फलंदाज टिकू शकला नाही. परिणामी अवघ्या 121 धावांत संपूर्ण संघ गडगडला.

92 वर्षाच्या इचिहासात सर्वात लाजिरवाणा दिवस : विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटच्या 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला भारतीय भूमीवर 3 किंवा 3 पेक्षा जास्त सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळालं आहे. तर भारताला भारतीय भूमीवर इतिहासात दुसऱ्यांदा व्हाईट वॉशचा सामना करावा लागला. याआधी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला होता. तसंच, भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्विप झाला आहे. भारतीय संघाचा हा पराभव अत्यंत लाजिरवाणा होता.

भारतीय फलंदाजी पूर्णपणे अयशस्वी : भारतीय संघाची फलंदाजी ही त्यांची सर्वात मजबूत बाजू मानली जाते. पण मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात 147 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी हा सर्वात कमकुवत दुवा ठरला. ऋषभ पंतची 64 धावांची खेळी वगळता एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. भारताचे 11 पैकी फक्त 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. म्हणजे 8 फलंदाजांनी 10 पेक्षा कमी धावा केल्या. एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्सच्या फिरकीसमोर संपूर्ण भारतीय संघ कोसळला. दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मानं 11 धावा केल्या आणि त्याचा सलामीचा जोडीदार यशस्वी जैस्वालनं 5 धावा केल्या. याशिवाय धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला विराट कोहली केवळ 1 धाव करुन बाद झाला. त्याच्याशिवाय शुभमन गिल आणि सरफराज खान यांनी प्रत्येकी 1 धावा काढल्या. तर रवींद्र जडेजा 6 धावा करुन, वॉशिंग्टन सुंदर 12 धावा, अश्विन 8 धावा करुन बाद झाला. आकाश दीप आणि सिराज यांना खातंही उघडता आलं नाही.

पहिल्या डावात भारताची आघाडी : न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. भारताकडून डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजानं पाच बळी घेतले. या सामन्यात किवी संघानं पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या डावात 263 धावा केल्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला 28 धावांची आघाडी मिळाली होती. मात्र ही पुरेशी नव्हती. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सामना खेळायला आला नाही. त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला. दुसरीकडे, ईश सोधी आणि मॅट हेन्री यांनी न्यूझीलंड संघात प्रवेश केला. मिचेल सँटनर आणि टिम साउथी या सामन्यात सहभागी नव्हते.

भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यांचा इतिहास काय : न्यूझीलंड संघानं 1955 मध्ये पहिल्यांदा भारताचा दौरा केला होता, तेव्हा त्यांना 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या मालिकेतील तीन सामने अनिर्णित राहिले. त्यानंतर 1965 मध्ये न्यूझीलंडचा संघ भारतात आला आणि यावेळीही त्यांना एकही कसोटी जिंकण्याची संधी मिळाली नाही. तेव्हा भारतानं 4 कसोटी मालिकेत 1-0 असा पराभव केला होता. तर 3 सामने ड्रॉ झाले. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 1969 मध्ये कीवी संघानं एकदा भारताचा दौरा केला आणि त्यावेळी भारतीय भूमीवर पहिली कसोटी जिंकली. त्यावेळी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यात न्यूझीलंडला यश आले.

कीवी संघानं जिंकली पहिला मालिका : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मागची कसोटी मालिका नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती. ही मालिका फक्त भारतीय भूमीवर झाली, ज्यात न्यूझीलंडला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला. एकूण कसोटी मालिका आणि सामन्यांचं रेकॉर्ड पाहिल्यास भारतीय संघाचा वरचष्मा दिसून येतो. मात्र सध्याची मालिका जिंकून न्यूझीलंडनं भारतीय संघाला मोठा धक्का दिला. तसंच भारतात पहिली मालिका जिंकण्याचा पराक्रमही केला होता.

हेही वाचा :

  1. 'साहेबां'चा कसोटीत पराभव करताच पाकिस्तानचा कॉन्फिडन्स वाढला; सामन्याच्या 24 तासाआधीच जाहीर केली प्लेइंग 11
  2. स्टेडियममध्य बसून बघायचा वनडे सामना? विमान तिकिटापेक्षा स्वस्तात मिळतंय मॅचचं तिकिट, 'असं' खरेदी करा ऑनलाईन
Last Updated : Nov 3, 2024, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details