माउंट मौनगानुई NZ vs SL 1st T20I Live Streaming :न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. ही मालिका आज 28 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात पहिले T20 मालिका खेळवली जाणार आहे.
श्रीलंकेचा 16 सदस्यीय संघ : या मालिकेसाठी श्रीलंकेनं 20 डिसेंबरला आपला संघ जाहीर केला आहे. तीन T20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत चरिथ असलंका श्रीलंकेच्या 16 सदस्यीय T20 संघाचं नेतृत्व करेल. नोव्हेंबरमध्ये घरच्या T20 मालिकेत न्यूझीलंडचा सामना करणाऱ्या संघाच्या तुलनेत संघात कोणतेही बदल झालेले नाहीत. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचं नेतृत्व चारिथ असालंका करत आहे.
मिचेल सँटनरकडे न्यूझीलंडची कमान : न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज मिचेल सँटनरला T20 आणि ODI साठी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. मिशेल सँटनर औपचारिकपणे केन विल्यमसनची जागा घेणार आहे. मिचेल सँटनरनं गेल्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर न्यूझीलंडचं नेतृत्व केलं होतं. परंतु ती नियुक्ती केवळ त्या मालिकेसाठी होती. सध्या मिचेल सँटनरकडे अधिकृतपणे T20 आणि वनडे फॉरमॅटसाठी न्यूझीलंडची कमान सोपवण्यात आली आहे. तसंच युवा फलंदाज बेव्हन जेकब्सचा प्रथमच T20 संघात समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : 2006 साली श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघानं 14 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेचा संघ फक्त आठ सामने जिंकू शकला आहे. त्याच वेळी, 2 सामने टाय झाले आहेत आणि 1 सामन्याचा निकाल लागला नाही. न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 8 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत न्यूझीलंड संघानं सहा सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्याच वेळी, 1 सामना बरोबरीत आहे.
मालिकेतील सामने कधी आणि कुठं खेळवले जातील?