महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कीवी संघ पराभवाचा बदला घेणार की इंग्रज मालिका जिंकणार? निर्णायक सामना 'इथं' पाहा लाईव्ह - NZ VS ENG 2ND TEST LIVE IN INDIA

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यात इंग्लंडचा संघ 1-0 नं आघाडीवर आहे.

NZ vs ENG 2nd Test Live Streaming
बेन स्टोक्स आणि टॉम लॅथम (New Zealand X Handle)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 5, 2024, 7:51 PM IST

वेलिंग्टन NZ vs ENG 2nd Test Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व इथं खेळवला जाणार आहे.

पहिल्या सामन्यात इंग्लंडचा विजय :तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राईस्टचर्च इथं खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघानं 8 विकेटनं विजय मिळवला होता. त्या सामन्यात ब्रेडन कार्सनं गोलंदाजीत इंग्लंडसाठी चमकदार कामगिरी केली आणि 10 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. तसंच आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जेकब बेथलनंही आक्रमक अर्धशतक झळकावत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

दोन्ही संघांनी जाहीर केली प्लेइंग 11 : दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी त्यांची प्लेइंग 11 जाहीर केले आहेत. विशे, म्हणजे दोन्ही संघांनी या सामन्यासाठी अनचेंज प्लेइंग 11 जाहीर केली आहे. या सामन्यात न्यूझीलंडची कमान टॉम लॅथमच्या खांद्यावर आहे. तर केन विल्यमसन दुखापतीनंतर परतला आहे, याशिवाय डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेलसह अनेक अनुभवी खेळाडू प्लेइंग 11 चा भाग आहेत. तर इंग्लंडचं नेतृत्व बेन स्टोक्सकडे असेल. याशिवाय जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रुट, हॅरी ब्रूक, ऑली पोप यांसारखे स्टार खेळाडू खेळणाऱ्या संघाचा भाग आहेत.

दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ आतापर्यंत 113 वेळा कसोटीत सामने आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं 113 पैकी 53 कसोटी सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडनं केवळ 13 सामने जिंकले आहेत. याशिवाय 47 सामने अनिर्णित राहिले आहेत. यावरुन इंग्लंडचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतीचा इतिहास कसा : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 40 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं 40 पैकी 24 मालिका जिंकल्या आहेत. तर कीवी संघानं 6 कसोटी मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय 10 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :

  • पहिला कसोटी सामना : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, (इंग्लंड 10 विकेटनं विजयी)
  • दुसरा कसोटी सामना : 6-10 डिसेंबर, बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • तिसरा कसोटी सामना: 14-18 डिसेंबर, सेडन पार्क, हॅमिल्टन

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार 6 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजेपासून बेसिन रिझर्व, वेलिंग्टन इथं खेळला जाईल.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?

सध्या भारतात टीव्हीवर न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिकेचं थेट प्रक्षेपण करण्याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11 :

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साऊदी, मॅट हेन्री, विल्यम ओ'रुर्के.

इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रुट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.

हेही वाचा :

  1. 'साहेबां'विरुद्ध पराभवाचा बदला घेण्यासाठी 'कीवीं'नी सामन्याच्या 24 तासाआधीच केली 'प्लेइंग इलेव्हन'ची घोषणा
  2. परंपरा प्रतिष्ठा अनुशासन… सामन्याच्या दोन दिवसआधीच प्लेइंग 11 जाहीर, याला म्हणतात 'कॉन्फिडन्स'

ABOUT THE AUTHOR

...view details