हॅमिल्टन NZ vs ENG 3rd Test : इंग्लंड आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडनं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना जिंकून किवी संघ क्लिन स्वीप टाळू इच्छितो. मात्र याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला असून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे.
पहिल्या दोन सामन्यात कशी कामगिरी : सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला, ज्यामध्ये त्यानं आपल्या फलंदाजीनं मोठी खेळी केली नाही. त्याला चार डावात फक्त 21 धावा करता आल्या. आता तो तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. त्यानं वसक्तिक कारणास्तव सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिली माहिती :प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की काही परिस्थितीमध्ये कुटुंब प्रथम येतं. डेव्हॉन आणि त्याची पत्नी किम यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण खरोखरच उत्सुक आहोत. मार्क चॅपमन नुकताच भारताच्या कसोटी संघासोबत होता. याशिवाय त्यानं प्लंकेट शील्डमध्ये 276 धावा केल्या असून तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसत आहे. त्यामुळं त्याच्यासाठी आमच्यात सामील होण्याची ही चांगली वेळ आहे.
अजून कसोटी पदार्पण केलेलं नाही : मार्क चॅपमननं अद्याप न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पण केलेलं नाही. पण या 30 वर्षीय फलंदाजानं वनडे आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. चॅपमननं आतापर्यंत 26 वनडे सामन्यांमध्ये एकूण 564 धावा केल्या आहेत, ज्यात त्यानं दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. याशिवाय 78 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1551 धावा आहेत.
हेही वाचा :
- भारताला 'व्हाईटवॉश' करणाऱ्या कीवींचा 'साहेबां'कडून सफाया; 16 वर्षांनंतर मानहानिकारक पराभव
- कुठुन येते इतकी कन्सिस्टंटन्सी...? 'कीवीं'विरुद्ध शतक झळकावत रुटनं केला महापराक्रम