महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

11 वर्षांपूर्वी सोडला भारत; आता नेपाळला सुपर ओव्हरमध्ये दिला विजय मिळवून

अमेरिका आणि नेपाळ यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत नेपाळनं दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

By ETV Bharat Sports Team

Published : 15 hours ago

Nepal Beat USA in Super Over
नेपाळ क्रिकेट संघ (ICC)

डल्लास Nepal Beat USA in Super Over : अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या नेपाळच्या क्रिकेट संघानं 3 सामन्यांची T20 मालिका एक सामना शिल्लक असताना जिंकली आहे. नेपाळनं मालिकेतील दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला आणि 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. नेपाळच्या एका खेळाडूनं सुपर ओव्हर जिंकली ज्याचं संपूर्ण बालपण भारतात गेलं. त्या खेळाडूला भारतात क्रिकेटचं नाद लागला. मात्र तो 11 वर्षांपूर्वी भारत सोडून नेपाळला गेला होता. आम्ही अष्टपैलू सोमपाल कामीबद्दल बोलत आहोत, ज्यानं सुपर ओव्हरमध्ये आपल्या अप्रतिम कामगिरीमुळं नेपाळला विजय मिळवून दिला.

सोमपालनं 11 वर्षांपूर्वी सोडलं भारत : सोमपाल कामी हा मूळचा नेपाळचा आहे. तो पश्चिम नेपाळच्या गुल्मीचा आहे. तो लहान असताना त्याचे पालक त्याला भारतात पंजाबमध्ये घेऊन गेले. भारतात राहत असताना सोमपालनं अनेक शालेय आणि क्लब क्रिकेट स्पर्धा खेळल्या. पण त्यानंतर करिअरला नवी दिशा देण्याच्या उद्देशानं तो पुन्हा 2013 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी नेपाळला गेला. सोमपालनं 2014 मध्ये नेपाळसाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघाचा मजबूत आधारस्तंभ बनला, ज्याचं उदाहरण त्यानं यूएसए विरुद्धच्या आपल्या कामगिरीनं दिलं.

नेपाळ-अमेरिकेनं केल्या 170 धावा : नेपाळ आणि अमेरिका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये झाला. तत्पूर्वी, 20-20 षटकांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघांनी 170-170 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना कुशल भुरटेलच्या नाबाद 92 धावांच्या बळावर नेपाळनं 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा केल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेनं 20 षटकांत 8 विकेट गमावत 170 धावा केल्या. अमेरिकेसाठी यष्टिरक्षक अँड्र्यू गॉसनं सर्वाधिक 62 धावांची खेळी खेळली.

नेपाळनं सुपर ओव्हरमध्ये जिंकला सामना : यूएसएनं सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी केली, जिथं जितक्या धावा व्हायला हव्या होत्या तितक्या धावा झाल्या नाहीत. परिस्थिती इतकी बिकट झाली की, पहिल्या 4 चेंडूत 2 धावांत 2 गडी गमावून USA चा संघ पूर्ण सुपर ओव्हरही खेळू शकला नाही. सोमपाल कामीनं या दोन्ही विकेट घेतल्या, त्यामुळं यूएसए संघ अडचणीत आला.

हेही वाचा :

  1. क्रिकेटला आज मिळणार T20 विश्वचषकाचा नवा विजेता, पहिल्यांदाच कोण उचलणार विश्वचषक? अंतिम सामना 'इथं' पाहा लाईव्ह
  2. T20 स्टाईलनं खेळलं कसोटी क्रिकेट, दोन त्रिशतकं झळकावणारा एकमेव भारतीय; 'बर्थ डे' बॉय सेहवागचे 'हे' विक्रम मोडणे अशक्य

ABOUT THE AUTHOR

...view details