ETV Bharat / sports

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं 11 मिनिटांत तीन गोल करत केली हॅटट्रिक; पाहा व्हिडिओ - LIONEL MESSI 11 MINUTES HAT TRICK

लिओनेल मेस्सीनं शनिवारी मेजर लीग सॉकरमध्ये जबरदस्त हॅटट्रिक केली आणि इंटर मियामीला MLS गुणांचा विक्रम मोडण्यात मदत केली.

Lionel Messi hat-trick in 11 Minutes
लिओनेल मेस्सी (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 20, 2024, 5:11 PM IST

फ्लोरिडा (यूएसए) Lionel Messi hat-trick in 11 Minutes : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या 11 मिनिटांच्या कालावधीत शानदार हॅटट्रिकमुळं त्याच्या संघ इंटर मियामीनं मेजर लीग सॉकर (MLS) सामन्यात न्यू इंग्लंड रिवोल्यूशनवर विजय मिळवला. संघानं हा सामना 6-2 नं जिंकला आणि इंटर मियामीनं नवीन MLS सिंगल-सीझन पॉईंट रेकॉर्ड केला.

मेस्सीनं केली 11 मिनिटांत हॅटट्रिक : मेस्सीनं सामन्याच्या 58व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून सामन्यात प्रवेश केला आणि लगेचच खेळावर प्रभाव पाडला. पहिल्या 39 मिनिटांनंतर, मियामी 0-2 नं पिछाडीवर होता, परंतु त्यानंतर खेळाचा मार्ग बदलला. 58व्या मिनिटाला मेस्सीनं प्रथम बेंजामिन क्रेमस्कीच्या गोलला मदत केली. त्यानंतर 37 वर्षीय खेळाडूनं सलग तीन गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह, मियामीनं (22-4-8, 74 गुण) 2021 मध्ये न्यू इंग्लंड रिवोल्यूशननं मिळवलेल्या 73 गुणांच्या मागील उच्चांकाला मागं टाकलं. या विजयाचा अर्थ हेरन्सनं सपोर्टर्स शील्ड देखील जिंकलं आणि आता MLS कप जिंकण्याचं त्यांचं लक्ष्य असेल.

मेस्सी-सुआरेझ जोडीची अप्रतिम कामगिरी : लुईस सुआरेझनंही दोन असिस्ट आणि दोन गोल करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मेस्सी आणि सुआरेझ या जोडीनं प्रत्येकी 20 गोलांसह यूएसएमध्ये पहिला हंगाम संपवला. अर्जेंटिनाच्या खेळाडूनं 19 सामन्यांत 16 असिस्ट केले तर उरुग्वेच्या खेळाडूनं 27 सामन्यात 9 असिस्ट केले. इंटर मियामीनं संपूर्ण सामन्यात 65.8 टक्के ताबा राखला आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा लक्ष्यावर अधिक शॉट्स देखील ठेवलं. इंटर मियामी शुक्रवारी सीएफ मॉन्ट्रियल आणि अटलांटा युनायटेड यांच्यातील ईस्टर्न कॉन्फरन्स वाइल्ड कार्ड सामन्यातील विजेत्याविरुद्ध पहिल्या प्ले-ऑफ सामन्यात भाग घेईल.

हेही वाचा :

  1. न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये भारताला मोठा धक्का; अंतिम सामन्यात जाण्याचा मार्ग कठीण
  2. T20 स्टाईलनं खेळलं कसोटी क्रिकेट, दोन त्रिशतकं झळकावणारा एकमेव भारतीय; 'बर्थ डे' बॉय सेहवागचे 'हे' विक्रम मोडणे अशक्य
  3. रोहित होता एका वर्षाचा, कोहली 24 दिवसांचा; न्यूझीलंडनं भारतात कधी जिंकला होता शेवटचा कसोटी सामना?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.