कराची Oledst Player to Take wicket in Champions Tropy : कराचीतील नॅशनल बँक स्टेडियमवर अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीनं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 40 वर्षीय नबी आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात विकेट घेणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. विशेष म्हणजे त्यानं त्याच्या पहिल्याच चेंडूवर ही कामगिरी केली आहे. या बाबतीत त्यानं अमेरिकेच्या हॉवर्ड जॉन्सन आणि नेदरलँड्सच्या रोलँड लेफेबवरे यांना मागे टाकलं आहे.
विकेट घेणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू : 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात झाली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी झाला. तर 21 फेब्रुवारी रोजी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर ग्रुप बी मधील अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टोनी डी झोर्जी आणि रायन रिकेलटन प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आले. पण झोर्जी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. नबीनं त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. दक्षिण आफ्रिकेनं 5 षटकांत 28 धावा केल्या होत्या. नबीनं सहावा षटक टाकला, जो त्याचा पहिलाच षटक होता. पहिल्याच चेंडूवर नाबीनं एक उत्तम कामगिरी केली. नबीच्या पहिल्याच चेंडूवर झोर्जीनं मिड-ऑनच्या दिशेनं शॉट खेळला पण अझमतुल्लाह उमरझाईनं चेंडू पकडला आणि झोर्जीचा डाव 11 चेंडूत 11 धावांवर संपला.