महाराष्ट्र

maharashtra

आश्चर्यच...! एकाच सामन्यात दोन्ही संघाकडून खेळत केला अनोखा विक्रम, हे झालं तरी कसं? - MLB star Danny Jansen

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 28, 2024, 12:59 PM IST

Danny Jansen : एकच सामन्यात एक खेळाडू दोन संघांसाठी खेळला, असं होऊ शकतं का? पण अमेरिकेतील प्रसिद्ध मेजर लीगमध्ये असंच घडलं. एकाच सामन्यात दोन्ही संघांकडून खेळणारा डेनी पहिला खेळाडू ठरला.

Danny Jansen
डेनी जान्सेन (AP Photo)

नवी दिल्ली Danny Jansen : यूएसए मेजर लीग बेसबॉल कॅचर डॅनी जेन्सेननं अनोखी कामगिरी करुन विक्रम केला. एकाच सामन्यात सहभागी होणाऱ्या संघांकडून खेळणारा जेन्सन हा पहिला खेळाडू ठरला. हे कसं घडू शकतं, एकच खेळाडू दोन संघांच्या वतीनं कसा सहभागी होऊ शकतो हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण तेच झालं.

कसा झाला अनोखा विक्रम : खरं तर, 26 जून रोजी जेन्सेन टोरंटो ब्लू जेससाठी बोस्टन रेड सॉक्स विरुद्ध फलंदाजी करत असताना पावसानं हस्तक्षेप केला आणि खेळ पुढं ढकलला गेला. एका महिन्यानंतर, 27 जुलै रोजी, जॅनसेनला रेड सॉक्सनं खरेदी केलं, ज्यामुळं त्याला पावसामुळं पुढं ढकलण्यात आलेल्या सामन्यात त्याच्याच संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. जरी जेन्सन त्याच्या हस्तांतरणानंतर रेड सॉक्ससाठी बऱ्याच सामन्यांमध्ये दिसला नाही, परंतु पावसामुळं पुढं ढकलण्यात आलेला खेळ सोमवारी पुन्हा सुरु झाला तेव्हा त्यानं संघात त्याचं स्थान पुन्हा मिळवलं. त्यामुळं एमएलबी स्टार डॅनी जेन्सनला एकाच सामन्यात दोन्ही संघांकडून खेळण्याची संधी मिळाली. कॅचर डॅनी जेन्सननं एकाच गेममध्ये बोस्टन रेड सॉक्स आणि टोरंटो ब्लू जेसकडून खेळून इतिहास घडवला.

काय म्हणाला जॉन्सन : द ॲथलेटिकशी बोलताना जॉन्सन म्हणाला, 'हे कसं काम करतं हे मला माहीत नाही. मी याबद्दल अनेकदा ऐकलं आहे. मी फक्त माझं डोकं खाली ठेवून खेळणार आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.' तसंच पुढं बोलताना तो म्हणाला, "खरं सांगायचं तर, जेव्हा मी याबद्दल ऐकलं तेव्हा मला असं वाटलं नाही की मी हे करणारा पहिली व्यक्ती असेल. हा खेळ खूप दिवसांपासून सुरु आहे. या सामन्यात घडणाऱ्या विचित्रांपैकी हा एक प्रकार आहे. हे अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक आहे."

हेही वाचा :

  1. जागतिक क्रिकेटवर भारताचा रुबाब; जय शाह बनले 'आयसीसी'चे किंग - Jay Shah New ICC Chairman
  2. हत्येचा आरोप असलेल्या 'या' IPL दिग्गजावर बोर्ड बंदी घालणार का? वकिलांनी केली 'ही' मोठी मागणी - IPL Star in Trouble

ABOUT THE AUTHOR

...view details