मोकी (चीन) India vs China Hockey Final : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा 1-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावलं. पहिले तीन क्वार्टर गोलशून्य राहिल्यानंतर भारतानं चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये शानदार गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. भारताच्या जुगराज सिंगनं सामन्यातील एकमेव गोल केला. भारतानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे.
Half-time and it's all even. A thrilling second half awaits! Let's go, India!🇮🇳💙
— Hockey India (@TheHockeyIndia) September 17, 2024
India 🇮🇳 0 - 0 🇨🇳 China#HockeyIndia #IndiaKaGame #INDvCHN #ACT24Finals
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola @FIH_Hockey pic.twitter.com/MZvr1sO70k
या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांकडून एकही गोल करण्यात यश आलं नाही. हाफ टाईमपर्यंत स्कोअर 0-0 असा राहिला. भारतीय संघ गोल करण्यासाठी धडपड करत राहिला पण काही यश मिळालं नाही. हाफ टाइमपर्यंत भारताला 5 पेनल्टी कॉर्नर मिळाले. तिसरा क्वार्टरही गोलशून्य राहिला. एकाही संघाला गोल करता आला नव्हता.
Congratulations to the Indian Men's Hockey Team on clinching their record-breaking 5th Asian Champions Trophy title! 🏆🏑
— Hockey India (@TheHockeyIndia) September 17, 2024
With a hard-fought 1-0 victory over China, India have not only retained their crown from 2023 but also solidified their position as the most successful team… pic.twitter.com/akCC5N6kGv
51व्या मिनिटाला जुगराज सिंगनं केला गोल : भारतानं चौथ्या क्वार्टरमध्ये चीनवर जोरदार आक्रमणं केलं. तब्बल 51व्या मिनिटाला भारताचा स्टार खेळाडू जुगराज सिंगनं अप्रतिम गोल करत भारताचं खातं उघडलं. या गोलमुळं भारतानं चीनवर 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर चीनच्या खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण, भारतानं अंतिम सामना 1-0 असा जिंकून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं.
After a fiercely contested 50 minutes of non-stop action, India finally broke through the deadlock with a crucial strike from Jugraj Singh, making it 1-0. That lone goal was all it took to secure the victory, and with it, the title!
— Hockey India (@TheHockeyIndia) September 17, 2024
Congratulations to the entire squad for their… pic.twitter.com/JPAdHQcogA
चॅम्पियन्स ट्रॉफी भारताच्या विजयाचा इतिहास : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2011 मध्ये भारतानं अंतिम सामन्यात पाकिस्तानला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 नं पराभूत करून विजेतेपद पटकावलं. त्यानंतर 2016 मध्ये भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानचा 3-2 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं. 2023 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं मलेशियाचा 4-3 असा पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. यंदा पुन्हा विजेतेपद पटकावलं.
Full Time
— Asian Hockey Federation (@asia_hockey) September 17, 2024
Hero Asian Champions Trophy Moqi China 2024#hact2024#asiahockey pic.twitter.com/zHqk9A1LNN
हेही वाचा
- नरेंद्र मोदी, अमित शाह ते शरद पवार 'यांनी' राजकारणासोबतच गाजवलंय क्रिकेटचं मैदान - Political Interference in Cricket
- कॅनडा विरुद्ध नेपाळ पहिला ODI सामना भारतात पाहता येणार लाईव्ह, वाचा सर्व अपडेट - CAN vs NEP 1st ODI Live in India
- रक्तरंजित कसोटी सामना... अवघ्या 62 चेंडूत संपला इतिहासातील सर्वात लहान सामना, स्वतःचा जीव वाचवत होते खेळाडू - Shortest Test Cricket Match