हैदराबाद Mohammed Siraj : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं नाव अलिकडेच भारताच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जानाई भोसलेशी जोडलं गेले. दोघांमध्ये नात्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. पण यानंतर काही दिवसांनीच सिराजनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि तिला त्याची बहीण म्हटलं. यानंतर आता असा दावा केला जात आहे की तो बिग बॉस फेम माहिरा शर्माला डेट करत आहे. मात्र, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता माहिराच्या आईला या गोष्टी कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. या बातम्यांमुळं ती प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळत आहे.
माहिराच्या आईनं काय म्हटलं : माहिरा शर्माच्या आईला सिराज आणि तिच्या मुलीच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तिला हे ऐकून खूप राग आला. तिनं टाईम्स नाऊशी बोलताना अशा अफवांवर नाराजी व्यक्त केली आणि ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं म्हटलं. ती म्हणाली, "काय म्हणताय? हे बरोबर नाही. माझी मुलगी एक सेलिब्रिटी आहे, म्हणून जर कोणी तिचं नाव कोणाशी जोडलं तर आपण ते खरं मानावं का? ही बातमी पूर्णपणे खोटी आहे." सिराज आणि माहिराच्या डेटिंगच्या अफवांना पहिल्यांदा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वेग आला होता. तेव्हा भारतीय क्रिकेटपटूनं माहिराचा फोटो लाईक केला होता. यानंतर दोघांमधील नात्याबद्दल चर्चा सुरु झाल्या.