भारतीय संघ 46 धावांत गारद... मात्र न्यूझीलंडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम - LOWEST TEAM TOTALS
बेंगळुरु कसोटी सामन्यात भारतीय संघ 46 धावांत सर्वबाद झाला. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या संघाची सर्वात कमी धावसंख्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
बेंगळुरु Lowest Score in Test Cricket History : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरु इथं खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला. भारताची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय भूमीवर कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय संघाचे पाच फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं एकूण 5 बळी घेतले. तर विल्यम ओ'रुर्कला एकूण 4 बळी मिळाले.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जात असलेल्या बेंगळुरु कसोटीनं भारताची खराब कामगिरी उघडकीस आणली, जिथं भारतीय संघ 46 धावांवर सर्वबाद झाला. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या संघाची सर्वात कमी धावसंख्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तर 1955 मध्ये ऑकलंडमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडनं कसोटी क्रिकेटमधील सर्वात लज्जास्पद विक्रम केला, जेव्हा संपूर्ण संघ केवळ 26 धावांवर बाद झाला. हा विक्रम आजही कायम आहे आणि कसोटी इतिहासातील सर्वात कमी सांघिक धावसंख्या मानली जाते.
न्यूझीलंडचा संघ कसा बिथरला? : या ऐतिहासिक सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अवघ्या 27 षटकांत खुर्दा उडवला. न्यूझीलंडचे 5 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यातील सर्वात मोठी वयक्तिक खेळी फक्त 11 धावांची होती. इंग्लंडसाठी फ्रेडी ट्रुमन आणि जॉनी वॉर्डल यांनी घातक गोलंदाजी केली, ज्यामुळं न्यूझीलंडचा संपूर्ण डाव उद्ध्वस्त झाला. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडचा संघ सावरु शकला नाही आणि सामना 8 गडी राखून गमावला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करणारे सामने :
संघ
धावा
षटकं
रन रेट
डाव
विरोधी संघ
मैदान
दिनांक
कसोटी सामना क्रमांक
न्यूझीलंड
26
27.0
0.96
3
इंग्लंड
ऑकलॅंड
25 मार्च 1955
टेस्ट # 402
दक्षिण आफ्रीका
30
18.4x5
1.91
4
इंग्लंड
गकेबरहा
13 फेब्रुवारी 1896
टेस्ट # 47
दक्षिण आफ्रीका
30
12.3
2.40
2
इंग्लंड
बर्मिंघम
14 जून 1924
टेस्ट # 153
दक्षिण आफ्रीका
35
22.4x5
1.84
4
इंग्लंड
केपटाउन
1 एप्रिल 1899
टेस्ट # 59
दक्षिण आफ्रीका
36
23.2
1.54
1
ऑस्ट्रेलिया
मेलबर्न
12 फेब्रुवारी 1932
टेस्ट # 216
ऑस्ट्रेलिया
36
23.0
1.56
2
इंग्लंड
बर्मिंघम
29 मे 1902
टेस्ट # 70
भारत
36
21.2
1.68
3
ऑस्ट्रेलिया
एडिलेड
17 डिसेंबर 2020
टेस्ट # 2396
आयर्लंड
38
15.4
2.42
4
इंग्लंड
लॉर्ड्स
24 जुलै 2019
टेस्ट # 2352
न्यूझीलंड
42
39.0
1.07
1
ऑस्ट्रेलिया
वेलिंगटन
29 मार्च 1946
टेस्ट # 275
ऑस्ट्रेलिया
42
37.3x4
1.66
2
इंग्लंड
सिडनी
10 फेब्रुवारी 1888
टेस्ट # 27
भारत
42
17.0
2.47
3
इंग्लंड
लॉर्ड्स
20 जून 1974
टेस्ट # 740
दक्षिण आफ्रीका
43
28.2x4
2.26
3
इंग्लंड
केपटाउन
25 मार्च 1889
टेस्ट # 32
बांगलादेश
43
18.4
2.30
1
वेस्ट इंडीज
नॉर्थ साउंड
4 जुलै 2018
टेस्ट # 2310
ऑस्ट्रेलिया
44
26.0x5
2.03
4
इंग्लंड
ओव्हल
10 ऑगस्ट 1896
टेस्ट # 52
दक्षिण आफ्रीका
45
31.3
1.42
3
ऑस्ट्रेलिया
मेलबर्न
12 फेब्रुवारी 1932
टेस्ट # 216
इंग्लंड
45
35.3x4
1.88
1
ऑस्ट्रेलिया
सिडनी
28 जानेवरी 1887
टेस्ट # 25
न्यूझीलंड
45
19.2
2.32
1
दक्षिण आफ्रीका
केपटाउन
2 जानेवरी 2013
टेस्ट # 2069
भारत
46
31.2
1.46
1
न्यूझीलंड
बेंगळुरु
16ऑक्टोबर 2024
टेस्ट # 2555
इंग्लंड
46
19.1
2.40
4
वेस्ट इंडीज
पोर्ट ऑफ स्पेन
25 मार्च 1994
टेस्ट # 1257
न्यूझीलंड
47
32.3
1.44
2
इंग्लंड
लॉर्ड्स
19 जून 1958
टेस्ट # 455
दक्षिण आफ्रीका
47
47.1x4
1.49
2
इंग्लंड
केपटाउन
25 मार्च 1889
टेस्ट # 32
वेस्ट इंडीज
47
25.3
1.84
3
इंग्लंड
किंग्स्टन
11 मार्च 2004
टेस्ट # 1687
ऑस्ट्रेलिया
47
18.0
2.61
3
दक्षिण आफ्रीका
केपटाउन
9 नोव्हेंबर 2011
टेस्ट # 2016
पाकिस्तान
49
29.1
1.68
2
दक्षिण आफ्रीका
जोहान्सबर्ग
1 फेब्रुवारी 2013
टेस्ट # 2072
इंग्लंड
51
33.2
1.53
3
वेस्ट इंडीज
किंग्स्टन
4 फेब्रुवारी 2009
टेस्ट # 1906
भारताची तिसरी सर्वात कमी धावसंख्या : 17 ऑक्टोबर रोजी बेंगळुरु कसोटीतही भारतीय संघानं लज्जास्पद कामगिरी केली आणि अवघ्या 46 धावांत त्यांचा पराभव झाला. भारताची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्के यांनी भारतीय फलंदाजांना टिकू दिलं नाही आणि भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. कसोटी क्रिकेटचा हा इतिहास सांगतो की कधी कधी अनुभवी संघही अपेक्षेपेक्षा वाईट कामगिरी करतात, पण न्यूझीलंडचा 26 धावांचा विक्रम अजूनही सर्वात लाजिरवाणा आहे.