मुंबई Bowlers who never bowled No-Ball : गोलंदाज म्हटल्यावर नो-बॉल आलाच, क्रिकेटमध्ये फिक्सिंग सोडली तर कोणताच गोलंदाज नो-बॉल पडणार नाही याची काळजी घेतो. परंतु सामना दबावाचा असेल तर नकळत गोलंदाजाकडून नो-बॉल फेकला जातो. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. विशेष म्हणजे या यादीत भारताला पहिल्यांदा विश्वविजेता बनवणाऱ्या कपिल देव यांचाही समावेश आहे.
नो बॉल म्हणजे काय :क्रिकेटमध्ये गोलंजदाजांसाठी एक लाईन असते, चेंडू टाकताना ती पार केली नाही पाहिजे. जर गोलंदाजानं लाईन ओलांडली तर त्यानं फंलदजाला बाद केले असले तरी तो बाद ठरत नाही. त्याला परत खेळण्याची संधी मिळते. इतकंच नाहीतर त्याली फ्री-हिट मिळत, त्यावर फलंदाज आऊट होत नाही. (रन आऊट होऊ शकतो)
कपिल देव :भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देवचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या करियरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. 1978 मध्ये डेब्यू केलेल्या कपिल देवनं 131 कसोटीत 434 विकेट घेतल्या. तर 225 वन डे सामन्यात 253 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कपिल देवचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं आहे.
डेनिस लिली : तसंच या यादीत क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियन गोलंदाज डेनिस लिली याचंही नाव आहे. 13 वर्षांच्या करियरमध्ये डेनिस लिलीनं एकही नो बॉल टाकला नाही. त्यानं 355 कसोटी विकेट आणि 103 वनडे विकेट घेतल्या आहेत.