नवी दिल्ली Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2024 Final :आयपीएल 2024 चा अंतिम सामना आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
चाहत्यांना IPL 2024 च्या फायनलमध्ये KKR कर्णधार श्रेयस अय्यर आणि SRH कर्णधार पॅट कमिन्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या अंतिम सामन्याच्या थेट प्रसारणाचा आनंद घेऊ शकतात. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. ईटीव्ही भारतवरून सामन्यांचे लाईव्ह अपडेट्स घेऊ शकणार आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सचे विश्वसनीय खेळाडू :आजच्या सामन्यात संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, सुनील नारायण आणि व्यंकटेश अय्यर यांच्याकडून पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. कोलकाताचे गोलंदाज वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा आणि मिचेल स्टार्क हे हैदराबादच्या फलंदाजांना मागे पाडू शकतात. मिचेल स्टार्कने क्वालिफायर 1 मध्ये SRH विरुद्ध अप्रतिम कामगिरी केली होती. या सामन्यातही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.
केकेआरचे दमदार खेळाडू
- फलंदाज
सुनील नारायण: सामना- 14, धावा- 482 (1 शतक/3 अर्धशतके)
श्रेयस अय्यर: सामना-14, धावा-345 (0 शतक/2 अर्धशतके)
व्यंकटेश अय्यर: सामना-14, धावा-318 (0 शतक/3 अर्धशतके)
- गोलंदाज
वरुण चक्रवर्ती: सामना-14, विकेट-20
हर्षित राणा: सामना-12, विकेट-17
मिचेल स्टार्क: सामना-13, विकेट-15
- अष्टपैलू