दुबई 900 Sixes in T20 Cricket :वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू किरॉन पोलार्ड त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. विशेषतः T20 क्रिकेटमध्ये, तो कोणत्याही संघासाठी पहिली पसंती राहतो. पोलार्ड जगभरात खेळल्या जाणाऱ्या T20 लीगमध्ये खेळतो आणि त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. दरम्यान, किरॉन पोलार्डनं आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. पोलार्डनं एक मोठी कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसराच फलंदाज ठरला.
पोलार्डनं केली उत्तम कामगिरी :सध्या युएईत ILT20 चं आयोजन केलं जातंय. यात किरॉन पोलार्ड एमआय एमिरेट्स संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत गुरुवारी एमआय एमिरेट्स आणि डेझर्ट वायपर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पोलार्डनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सामन्यात पोलार्डनं 23 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्यानं त्याच्या खेळीदरम्यान दोन चौकार आणि तीन षटकार मारले. यासह, त्यानं T20 क्रिकेटमध्ये 900 षटकार पूर्ण केले आहेत. यासह तो T20 क्रिकेटमध्ये 900 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. याआधी फक्त ख्रिस गेलनं 900+ षटकार मारले आहेत.