महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कन्कशन सबस्टिट्यूट नियमावरुन वाद, जॉस बटलर संतापला... प्लेइंग 11 मध्ये नसलेला हर्षित राणा मैदानात कसा? - CONCUSSION SUBSTITUTE

भारतानं पुणे T20 सामना 15 धावांनी जिंकला. या विजयासह, त्यांना मालिकेत 3-1 अशी अजिंक्य आघाडी मिळाली.

Concussion Substitute Controversy
भारत विरुद्ध इंग्लंड (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 1, 2025, 9:41 AM IST

पुणे Concussion Substitute Controversy : भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्ध पुणे T20 सामना जिंकला आणि यासोबत मालिकाही जिंकली. मात्र, पुण्यातील पराभवानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद कन्कशन सबस्टिट्यूटवरुन झाला ज्यामुळं इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनं या कन्कशन सबस्टिट्यूटबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. पुणे T20 मध्ये वापरल्या जाणाऱ्या कन्कशन सबस्टिट्यूटशी तो सहमत नसल्याचं जॉस बटलर म्हणाला. त्याच्या मते, यात चूक झाली आणि त्यानं थेट सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

जॉस बटलरनं कन्कशन सबस्टिट्यूटवर उपस्थित केले प्रश्न : पुणे T20 मधील पराभवानंतर, इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर पत्रकार परिषदेसाठी आला. जिथं त्यानं माध्यमांशी बोलताना कन्कशन सबस्टिट्यूटबाबतच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. त्याच्या मते सामनाधिकाऱ्यांचा निर्णय योग्य नव्हता. खरंतर, भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला. जेव्हा तो मैदानाबाहेर गेला तेव्हा त्याला चक्कर येत असल्याची तक्रार होती. यानंतर, टीम इंडियानं त्याच्या जागी एका कन्कशन सब्स्टिस्टीट्यूटला घेतलं. टीम इंडियानं दुबेच्या जागी हर्षित राणाला संधी दिली. सामनाधिकाऱ्यांनी याला परवानगी दिली.

हर्षित राणा वरुन वाद का? :हर्षित राणाला कन्कशन पर्याय म्हणून आणण्यावरुन वाद का आहे? खरं तर, कन्कशन सबस्टिट्यूट नियमानुसार, संघ जखमी खेळाडू सारखाच खेळाडू मैदानात उतरवू शकतो. आता शिवम दुबे हा फलंदाजीचा अष्टपैलू खेळाडू आहे पण हर्षित राणा हा गोलंदाजीचा अष्टपैलू खेळाडू आहे. दोघांच्या गोलंदाजीत खूप फरक आहे, त्यामुळं नियमांनुसार इंग्लंडच्या कर्णधारानं यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

माजी क्रिकेटपटूंनी उपस्थित केले प्रश्न : हर्षित राणा इंग्लंडच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण बनला. राणानं त्याच्या पहिल्याच षटकात लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केलं आणि त्यानंतर त्याने आणखी दोन विकेट घेतल्या. त्यानं 19 व्या षटकात फक्त 6 धावा दिल्या आणि ओव्हरटनची महत्त्वाची विकेटही घेतली, ज्यामुळं इंग्लंडचा पराभव झाला. कन्कशन सबस्टिट्यूटच्या नियमामुळं इंग्लंडचं बरंच नुकसान झालं. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननं यावर प्रश्न उपस्थित केले. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते, रमनदीप सिंगला कन्कशन सबस्टिट्यूट नियमानुसार शिवम दुबेची जागा घ्यावी लागली. म्हणजे तो हर्षित राणाच्या बाजूनं नव्हता.

हेही वाचा :

  1. मैदानावर कार ते आग... आतापर्यंत 'या' विचित्र कारणांमुळं थांबवावी लागली क्रिकेट मॅच
  2. इंग्रजांना हरवत भारतीय महिला संघ U19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details