जेद्दाह IPL Auction Update Day 2 :इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगामाचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया इथं सुरु आहे. पहिल्या दिवशी (24 नोव्हेंबर) सर्व 10 संघांनी एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करुन 72 खेळाडूंना खरेदी केलं. यानंतर आता आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी (25 नोव्हेंबर) लिलाव होणार आहे.
अजिंक्य राहाणे, पृथेवी शॉला मिळाला नाही खरेदीदार : लिलावाच्या आज दुसऱ्या दिवशी सुरुवातीला अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. यात ग्लेन फिलिप्स, केन विल्यमसन, शार्दुल ठाकूर, अजिंक्य राहाणे, पृथ्वी शॉ हे खेळाडू अनसोल्ड राहिले. तर दिग्गज फलंदाज फाफ डु प्लेसिसला दिल्लीनं त्याच्या आधारभूत किंमतीत म्हणजे 2 कोटी रुपयांत खरेदी केलं.
दुसऱ्या दिवशी आतापर्यंत खरेदी झालेल्या खेळाडूंची यादी :
- रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडिज) : 1.5 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 1.5 कोटी)
- फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका) : 2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- वॉशिंग्टन सुंदर (भारत) : 3.20 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- सॅम कुरन (इंग्लंड) : 2.40 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- मार्को जॅन्सेन (दक्षिण आफ्रिका) : 7 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 1.25 कोटी)
- कृणाल पंड्या (भारत) : 5.75 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- नितीश राणा (भारत) : 4.20 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 1.5 कोटी)
- रायन रिकेल्टन (दक्षिण आफ्रिका) : 1 कोटी रुपये, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- जोश इंग्लिस (ऑस्ट्रेलिया) : 2.6 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- भुवनेश्वर कुमार (भारत) : 10.75 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- तुषार देशपांडे (भारत) : 6.5 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- गिराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका) : 2.40 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 1.25 कोटी)
- मुकेश कुमार (भारत) : 8 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- दीपक चहर (भारत) : 9.25 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- आकाश दीप (भारत) : 8 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) : 2 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- अल्लाह गझनफर (अफगाणिस्तान) : 4.80 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 75 लाख)
आज होणार 132 खेळाडूंची विक्री : दुसऱ्या दिवशी 132 खेळाडूंची विक्री होणार आहे. या खरेदी करण्यासाठी, सर्व 10 संघांच्या पर्समध्ये एकूण 173.55 कोटी रुपये शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवशी फाफ डु प्लेसिस, ग्लेन फिलिप्स, सॅम कुरन, केन विल्यमसन, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लॉकी फर्ग्युसन, टीम डेव्हिड, विल जॅक, नवीन उल हक, स्टीव्ह स्मिथ यांसारखे मोठे खेळाडू लिलावात उतरतील.