नवी दिल्लीIPL 2024 Schedule : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. आतापर्यंत 7 एप्रिलपर्यंतचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
- आयपीएलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 फेब्रुवारीला चाहत्यांना डबल हेडरचे सामने पाहायला मिळणार आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना मोहालीमध्ये खेळला जाणार आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर एकमेकांशी भिडणार आहेत.
पहिल्या टप्प्याचा अंतिम सामना 7 एप्रिलला होणार-22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झाल्यानं क्रिकेट चाहत्यामध्ये उत्साह आहे. या पहिल्या टप्प्यात सर्व 10 संघांना एकूण 21 सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत आठ संघ 4-4 सामने खेळणार आहेत. तर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ 5-5 सामने खेळणार आहेत. हे सर्व सामने 10 ठिकाणी खेळवले जाणार आहेत. आयपीएलच्या या पहिल्या टप्प्याचा अंतिम सामना 7 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स तसंच गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.
येथे होणार IPL 2024 सामने :
- चेन्नई
- बेंगळुरू
- अहमदाबाद
- मोहाली
- विशाखापट्टणम
- मुंबई
- हैदराबाद
- लखनौ
- जयपूर
- कोलकाता