मुंबई Hardik Pandya : येत्या 22 मार्चपासून 'आयपीएल'ला (IPL 2024) सुरुवात होत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. तसंच या 'आयपीएल'मध्ये माझं लक्ष हे चांगली गोलंदाजी करण्यावर असेन, असं हार्दिक पंड्या यावेळी म्हणाला. तसंच मी पूर्णपणे फिट असल्याचंही पंड्यानं यावेळी दाखवून दिलं.
'आयपीएल'साठी हार्दिक फिट : २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो क्रिकेटमधून बाहेर पडला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पंड्यानं पहिल्यांदाच 'डीवाय पाटील टी 20' स्पर्धा खेळली आणि आपण 'आयपीएल'साठी फिट असल्यांच त्यानं दाखवून दिलं.
MI मध्ये येणं चांगली भावना : रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवरुन रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली होती. यावरुन अनेक मिम्सही सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळं मुंबई इंडियन्स, हार्दिक पंड्या चांगलेच ट्रोल झाले होते. मुंबई इंडियन्समध्ये परत येणं ही एक वास्तविक भावना आहे, असं हार्दिक पंड्यानं म्हटलंय.