महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लोकसभेच्या रणधुमाळीत रंगणार आयपीएल, 'या' तारखेपासून होणार सुरु; 17 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार 'ही' गोष्ट - आयपीएल

IPL 2024 : आयपीएलच्या 17व्या हंगामाची क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. अशातच इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी आयपीएल 2024 चे सर्व सामने भारतात खेळवले जातील अशी घोषणा केलीय. तसंच त्यांनी कोणत्या तारखेपासून आयपीएस सुरु होईल याची ही माहिती दिलीय.

आयपीएल
आयपीएल

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 11:00 AM IST

Updated : Feb 21, 2024, 11:19 AM IST

नवी दिल्ली IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चं आगामी सत्र 22 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदा देशात लोकसभा निवडणुका असूनही संपूर्ण आयपीएल देशातच आयोजित केलं जाणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिलीय. देशात एप्रिल आणि मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही.

काय म्हणाले आयपीएलचे अध्यक्ष? :धुमल यांनी आयपीएलच्या आयोजनाबाबत सांगितलं की, "सुरुवातीला या लीगच्या पहिल्या 15 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल." लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, आयपीएलच्या 17 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होईल की आधी 15 दिवसांचं वेळापत्रक जाहीर होईल आणि उर्वरित वेळापत्रक नंतर जाहीर होईल.

22 मार्चपासून आयपीएल सुरु होण्याची शक्यता :आयपीएलच्या तारखेबाबत धुमाळ म्हणाले, "आम्ही 22 मार्चपासून स्पर्धा सुरु करण्याचा विचार करत आहोत. यासाठी आम्ही सरकारबरोबर चर्चा करत आहोत. यंदाची संपूर्ण स्पर्धा भारतात होणार आहे." यापूर्वी 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, आयपीएलचा संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. तर 2014 मध्ये काही सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ही संपूर्ण लीग देशातच आयोजित करण्यात आली होती. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

पहिला सामना कोणत्या संघात होणार? : भारतीय संघ 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 1 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्यानं होणार आहे. साधारणपणे आयपीएलचा सलामीचा सामना हा मागील वर्षीचा विजेता आणि उपविजेता यांच्यात असतो. त्यानुसार यंदाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. 'संघासह इंग्लंडला परत जा नाहीतर...'; रांचीतील चौथा कसोटी सामना रद्द करण्याची खलिस्तानी 'पन्नू'ची धमकी
  2. India vs England Test : मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून 'आऊट'; काय आहे कारण?
  3. India Vs England : भारतीय संघानं 180 मिनिटांत केलं इंग्लंडला चितपट, कसोटीत 90 वर्षातील सर्वात मोठा पराभव
Last Updated : Feb 21, 2024, 11:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details