क्वालालंपूर India Wins U19 Womens T20 World Cup :आयसीसी महिला अंडर-19 T20 विश्वचषक 2025चा अंतिम सामना भारताचा 19 वर्षांखालील महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात आज क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल इथं खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 9 विकेटनं विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे.
टीम इंडियानं सहज गाठलं लक्ष्य : अंतिम सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 83 धावांचं लक्ष्य मिळालं. भारतीय संघानं हे लक्ष्य अगदी सहज गाठलं. यादरम्यान, सलामीवीर गोंगडी त्रिशा आणि कमलिनी यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी फक्त 4.3 षटकांत 36 धावा जोडल्या. त्यामुळं भारतीय संघानं केवळ 1 विकेट गमावून लक्ष्य गाठलं आणि सामना जिंकला. गेल्या वर्षीही भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले होते. तेव्हाही टीम इंडिया जिंकली होती.
सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव :या स्पर्धेत आतापर्यंत आठ पैकी आठ सामने जिंकून भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं उपांत्य फेरीत इंग्लंडला नऊ विकेट्सनं हरवून आपली ताकद चमकदारपणे दाखवली. दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेनं सात विजयांसह आणि एक सामना पावसामुळं रद्द करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सनं हरवलं आणि शानदार खेळ केला.
भारतीय संघ स्पर्धेत अपराजित :आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ रविवारी होणाऱ्या महिला अंडर-19 T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना करताना सलग दुसरं विजेतेपद जिंकण्याचं लक्ष्य ठेवेल. भारतानं आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे, त्यांनी या स्पर्धेत त्यांचे सर्व सहा सामने जिंकले आहेत. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघानं आतापर्यंत सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतानं वेस्ट इंडिज (नऊ विकेट्स), मलेशिया (10 विकेट्स), श्रीलंका (60 धावा), बांगलादेश (8 विकेट्स), स्कॉटलंड (150 धावा) आणि इंग्लंड (सेमीफायनलमध्ये नऊ विकेट्स) यांच्यावर सहज विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिका डाव कोसळला : या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ फायदा घेऊ शकला नाही. 20 षटकांत 82 धावा करुन ते सर्वबाद झाले. यात, दक्षिण आफ्रिकेचा कोणताही फलंदाज 30 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. या डावात मिके व्हॅन वुर्स्टनं सर्वाधिक 23 धावा केल्या. त्याच वेळी, जेम्मा बोथानं 16 धावांचं योगदान दिलं आणि फेय काउलिंगनं 15 धावांचं योगदान दिलं. दुसरीकडे, भारताकडून गोंगडी त्रिशा व्यतिरिक्त, वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनीही भारताकडून 2-2 विकेट घेतल्या. शबनम शकीललाही 1 विकेट मिळाली.
हेही वाचा :
- 'लाइफटाइम अचीवमेंट' पुरस्कारनं सचिनचा सन्मान; बुमराह आणि मंधानालाही मिळाला अवार्ड
- ट्रेनच्या प्रवासभाड्यात मिळतंय IND vs ENG मुंबईत होणाऱ्या T20I मॅचचं तिकिटं, कसं बुक करायचं? वाचा सोपी ट्रीक