हाँगकाँग IND vs PAK Hong Kong sixes Live Streaming : हाँगकाँग सुपर सिक्स टूर्नामेंटचं सात वर्षांनी पुनरागमन झालं आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ भिडणार आहेत. विश्वविजेता खेळाडू रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी दिवाळीच्याच दिवशी 1 ऑक्टोबर रोजी टिन क्वांग रोड क्रिकेट मैदानावर सामना होणार आहे. ही स्पर्धा 3 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. एका संघात 6 खेळाडूंचा समावेश असेल. बारा संघांना प्रत्येकी तीन संघांचा समावेश असलेल्या चार गटांमध्ये विभागलं आहे. जे राउंड रॉबिन आधारावर सहभागी होतील. भारतीय संघ क गटात आहे ज्यात पाकिस्तान आणि यूएईचे संघ आहेत.
कोणत्या गटात कोणते संघ :यजमान हाँगकाँगला दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसह अ गटात स्थान देण्यात आलं आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि नेपाळचे संघ आहेत. श्रीलंका, बांगलादेश आणि ओमानचे संघ ड गटात आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि यजमान हाँगकाँग यांच्यात होणार आहे. यानंतर पहिल्याच दिवशी हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सर्व पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील. उपांत्यपूर्व फेरीतील विजयी संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
- गट A : हाँगकाँग, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका
- गट B : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि नेपाळ
- गट C : भारत, पाकिस्तान आणि UAE
- गट D : श्रीलंका, बांगलादेश आणि ओमान
तीन दिवसांत होणार 29 सामने : हाँगकाँग सुपर सिक्स टूर्नामेंटमध्ये एकूण 29 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होईल तर लाईव्ह स्ट्रीमिंग फॅन कोडवर असेल. त्याचं प्रसारण हाँगकाँगच्या वेळेनुसार सकाळी 8:15 आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 5:45 वाजता होईल. पहिल्या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान असे एकूण 10 सामने होणार आहेत. दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला 10 सामने खेळवले जातील. या दिवशी भारतीय संघ यूएईशी भिडणार आहे.