महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेश इतिहास रचणार की भारत मालिका जिंकणार? दुसरा T20 सामना 'इथं' पाहा लाईव्ह - IND VS BAN 2ND T20I LIVE IN INDIA

भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील आज दुसरा सामना होणार आहे.

IND vs BAN 2nd T20I Live
भारत आणि बांगलादेश (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 9, 2024, 7:30 AM IST

नवी दिल्लीIND vs BAN 2nd T20I Live Streaming : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज 9 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकांत 127 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानं 11.5 षटकांतच लक्ष्य गाठलं होतं. यासह भारतीय संघानं तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारताच्या नजरा दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला हरवून मालिका जिंकण्यावर असतील. दुसरीकडे पाहुणा संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. दुसरा सामनाही रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 15 वेळा T20 सामने झाला आहे. ज्यात भारतीय संघानं 13 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला केवळ एकच विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाचा वरचष्मा दिसतो. भारतानं पाचही सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. तर बांगलादेशनं एकही सामना जिंकलेला नाही.

याच मैदानावर एकमेव विजय : बांगलादेशचा भारताविरुद्ध एकमेव विजय दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झाला होता. वास्तविक, 2019 मध्ये इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं भारताचा 7 गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला केवळ 146 धावाच करता आल्या. मुशफिकुर रहीमच्या 43 चेंडूत केलेल्या 60 धावांच्या जोरावर बांगलादेशनं 3 गडी गमावून लक्ष्य गाठलं होतं.

खेळपट्टी कशी असेल : अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असून गेल्या काही वर्षांत ही खेळपट्टी बऱ्याच अंशी फलंदाजांना अनुकूल झाली आहे. इथं फलंदाजांचं वर्चस्व असेल आणि फलंदाज मोठी खेळी खेळू शकतील. कारण मैदान लहान आहे. जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टीही फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरते. अशा स्थितीत भारत आणि बांगलादेश यांच्यात उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळला जाईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना बुधवार, 09 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना कुठं खेळवला जाईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, नवी दिल्ली इथं होणार आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना किती वाजता सुरु होईल?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरु होईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा T20 सामना भारतात स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर दिसेल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जियो सिनेमा ॲपवर पाहू शकाल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रीयान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

बांगलादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ होसेन आमोन, तौहीद हृदयॉय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

हेही वाचा :

  1. सचिन तेंडुलकर पुन्हा दिसणार भारतीय जर्सीत... कोणत्या लीगमध्ये करणार भारताचं नेतृत्व? वाचा A टू Z माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details