नवी मुंबई India Masters vs England Masters T20 : इंडिया मास्टर्स क्रिकेट संघानं सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली. 22 फेब्रुवारी रोजी श्रीलंका मास्टर्सविरुद्धच्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवून त्यांनी पॉइंट टेबलमध्ये आपलं खातं उघडलं आहे. आता इंडिया मास्टर्स संघाला या T20 लीगमधील आपला दुसरा सामना आज 25 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड मास्टर्स संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा महान फलंदाज सचिन तेंडुलकरवर असतील, ज्याच्याकडून सर्व चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
इंडिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्समधील सामना मोफत कसा पाहायचा :आयएमएल T20 मध्ये इंडिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स यांच्यातील हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे या स्पर्धेचे आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत आणि दोन्हीमध्ये फलंदाजांचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत, चाहते या सामन्यातही मोठ्या धावसंख्येची अपेक्षा करु शकतात. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. भारतीय चाहते हा सामना टीव्हीवर कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्सवर थेट पाहू शकतात. तसंच चाहते जिओ हॉटस्टार अॅपवर सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत ऑनलाइन पाहू शकतात, जिथं ते इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत समालोचनाचा आनंद घेऊ शकतील.
इंडिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स संघाची टीम :