हैदराबाद IND vs ENG 1st Test Day 4 :भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 420 धावांवर सर्व बाद झाले आहेत. इंग्लंडकडून ओली पोपनं दमदार 196 धावांची खेळी केली. मात्र त्याचं द्विशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. भारताला पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी 231 धावांचं आव्हानं असेल. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहनं 4 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विननं 3 आणि रवींद्र जडेजानं 2 बळी घेतले. तर अक्षर पटेलला 1 बळी घेण्यात यश आलंय.
हैदराबाद कसोटीत आतापर्यंत काय झालं : इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. इंग्लंडकडून पहिल्या डावात कर्णधार बेन स्टोक्सनं सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. तर भारतीय संघाकडून रवी अश्विन आणि रवींद्र जडेजानं 3-3 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले. इंग्लंडच्या 246 धावांना प्रत्युत्तर देताना भारतानं 436 धावा केल्या. यात भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक 87 धावा केल्या होत्या. तर के एल राहुलनं 86 धावांचे योगदान दिले. यशस्वी जैस्वालनंही 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
भारताला विजयासाठी 231 धावांची गरज :पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाकडं 190 धावांची भक्कम आघाडी होती. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडनं ओली पोपच्या दिडशतकी खेळीच्या बळावर दुसऱ्या डावात 420 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघाला कसोटी जिंकण्यासाठी 231 धावांची गरज आहे. सध्या भारताचे दोन्ही सलामीवीर खेळत आहेत.
ओली पोपनं इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकचा मोडला विक्रम :ओली पोपनं 196 धावांची खेळी करताच त्याच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झालीय. तो आता भारतीय भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा इंग्लीश फलंदाज ठरलाय. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. पण आता ओली पोपनं आपल्या माजी कर्णधाराला मागं सोडलंय. ॲलिस्टर कूकनं 2012 मध्ये अहमदाबादमध्ये 176 धावांची खेळी केली होती, मात्र आता ओली पोपनं पुढं बाजी मारलीय.
हेही वाचा :
- अखेर तो परतला! आयपीएलपूर्वी हार्दिक पांड्याची धुवांधार गोलंदाजी
- इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटूनं उद्धवस्त केलं भारतीय संघाचं 'रुट'; भारताकडं भक्कम आघाडी, दुसऱ्या डावात साहेबांना पहिला धक्का
- काय सांगता! 147 चेंडूत 300 धावा; हैदराबादच्या तन्मयनं रचला इतिहास, ब्रायन लाराचा 'हा' विक्रमही धोक्यात