महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कानपूर कसोटी: दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांनी नव्हे तर 'इंद्रदेवां'नी केली बॅटींग - IND vs BAN 2nd Test - IND VS BAN 2ND TEST

IND vs BAN 2nd Test Day 2 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (28 सप्टेंबर) पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला.

IND vs BAN 2nd Test Day 2
IND vs BAN 2nd Test Day 2 (AFP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 28, 2024, 2:28 PM IST

Updated : Sep 28, 2024, 2:50 PM IST

कानपूर IND vs BAN 2nd Test Day 2 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (28 सप्टेंबर) पावसामुळं पूर्णपणे वाहून गेला. दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशची पहिल्या डावात तीन विकेट्सवर 107 धावा आहेत. मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर नाबाद आहेत. शनिवारी कानपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळं खेळ सुरु होण्यासाठी परिस्थिती योग्य नव्हती.

पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ : खराब प्रकाश आणि पावसामुळं पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. त्या सामन्यात रविचंद्रन अश्विननं अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती.

बांगलादेशची खराब सुरुवात : या सामन्यात प्रथम फलंदाजीला आल्यावर बांगलादेशनं चांगली सुरुवात केली. पण या सामन्यात षटक टाकायला आलेल्या आकाश दीपनं झाकीर हसनला स्लिपमध्ये यशस्वी जैस्वालकडं झेलबाद केलं. त्यावेळी बांगलादेश संघाची धावसंख्या 26 धावा होती. धावफलकावर अवघ्या 29 धावा असताना आकाश दीपनं शदमान इस्लामला (24) पायचीत पकडलं. उपाहारापर्यंत बांगलादेशची धावसंख्या 74/2 होती. मात्र उपाहारानंतर लगेचच कर्णधार नझमुल हुसेन शांतो (31) अश्विनच्या चेंडूवर पायचीत झाला.

17 मालिकांपासून भारत अजिंक्य : घरच्या भूमीवर भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. 2012 पासून भारतीय संघ घरच्या मैदानावर चांगली खेळली आहे. त्यानंतर भारतानं घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. म्हणजेच नोव्हेंबर 2012 पासून भारत सलग 17 घरच्या कसोटी मालिकेत अपराजित आहे. दुसरीकडे बांगलादेशी संघ पाकिस्तानला मालिकेत 2-0 ने पराभूत करुन भारतात आला आहे.

हेही वाचा :

  1. भारत दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजांचं लंकन गोलंदाजीसमोर 'त्राहिमाम'; अवघ्या 88 धावांत खुर्दा - SL vs NZ 2nd Test Live
  2. याला म्हणतात नाद... विराटची फलंदाजी पाहण्यासाठी 15 वर्षाच्या पठ्ठ्यानं 58 किमी सायकल चालवत गाठलं कानपूर; पाहा व्हिडिओ - Virat Kohli Fan
Last Updated : Sep 28, 2024, 2:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details