महाराष्ट्र

maharashtra

विराट कोहली घेणार ब्रिटिश नागरिकत्व...? भारताकडून खेळेल का? - Virat Kohli UK Citizenship

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 5, 2024, 7:23 PM IST

Updated : Sep 11, 2024, 3:04 PM IST

Virat Kohli UK Citizenship Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे, लंडनमध्ये असल्यामुळं काही लोकांचं म्हणणे आहे की तो लंडनचं नागरिकत्व घेण्याचा विचार करत आहे.

Virat Kohli UK Citizenship
विराट कोहली (ANI Photo)

नवी दिल्ली Virat Kohli UK Citizenship Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या लंडनमध्ये कुटुंबासह सुट्टी घालवत आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाला 19 सप्टेंबरपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळायचा नाही. भारतीय संघ 20 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेत विराट कोहली खेळण्याची शक्यता आहे. कोहली नुकताच लंडनच्या रस्त्यावर सार्वजनिक स्वरुपात दिसला. लंडनमध्ये कोहलीला रस्ता ओलांडताना कॅप्चर करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, चाहत्यांनी उत्सुकतेनं त्यावर शेअर आणि टिप्पणी केली. या व्हिडिओमध्ये कोहली त्याची पत्नी, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि त्यांचा नवजात मुलगा अकायसोबत होता.

यामुळं आता काही चाहते विराट कोहली ब्रिटनचं नागरिकत्व घेणार असल्याचंही म्हणत आहेत. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक पोस्ट पाहण्यात आल्या, ज्यात हा दावा करण्यात आला आहे. मात्र ही निव्वळ अफवा असून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. यामुळं आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, विराट कोहलीला ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यास तो भारताकडून खेळू शकेल का? अशा प्रकरणांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) कोणत्या तरतुदी केल्या आहेत? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.

आयसीसीचा नियम काय म्हणतो :विराट कोहली इंग्लिश नागरिकत्व घेणार की नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण तो घेणार का, हे संस्थेनं केलेल्या नियमांवर अवलंबून असेल. नागरिकत्व आणि क्रिकेट खेळण्याच्या पात्रतेबाबत आयसीसीचे नियम असं सांगतात की, राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळण्यासाठी खेळाडूनं तो ज्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहे, त्या देशाचा नागरिक असणं आवश्यक आहे. हे देशात जन्माला आल्यानं किंवा देशाचा वैध पासपोर्ट धारण करुनही सिद्ध केलं जाऊ शकतं. याचा अर्थ ते प्रतिनिधित्व करत असलेल्या देशाचा पासपोर्ट त्यांच्याकडं असणं आवश्यक आहे.

भारतीय नागरिकत्व कायदे काय : भारतात दुहेरी नागरिकत्व देण्याची कोणतीही अधिकृत तरतूद नाही. दुहेरी नागरिकत्व उद्भवते तेव्हा एखादी व्यक्ती कायदेशीररित्या एकाच वेळी दोन किंवा अधिक देशांची नागरिक म्हणून ओळखली जाते. तथापि, परदेशी नागरिकाकडं भारताचे ओव्हरसीज सिटिझन (OCI) कार्ड आहे जे भारतीय वंशाच्या लोकांना अनिश्चित काळासाठी देशात राहण्याची आणि काम करण्याची परवानगी देतं. कोहली इंग्लंडला गेला पण त्याच्याकडे भारताचं नागरिकत्व असल्यास, तो OCI कार्डसाठी अर्ज करु शकतो. पण, देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी हे चालत नाही. OCI कार्ड हे भारतीय नागरिकत्वाच्या बरोबरीचं नाही.

जर कोहलीला दुसऱ्या देशासाठी खेळायचं असेल, तर त्याला ठराविक कालावधीसाठी थांबावं लागेल आणि आयसीसीच्या नियमांनुसार भारताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर त्या देशासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल. कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्यानं खेळाच्या सर्वात लहान स्वरुपातून म्हणजेच T20 तून आधीच निवृत्ती घेतली आहे, त्यामुळं भारतीय क्रिकेटपटू फक्त क्रिकेट खेळण्यासाठी देश बदलेल याची फारशी शक्यता नाही.

ऐतिहासिक उदाहरणं : क्रिकेटमधील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी म्हणून राष्ट्रीयत्व बदललं आहे. इयॉन मॉर्गन सारखे अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी 2019 चा एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडचा कर्णधार म्हणून जिंकला आणि 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात आयर्लंडचं प्रतिनिधित्व केलं. दुसरं उदाहरण म्हणजे केविन पीटरसन, जो सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर इंग्लंडकडून खेळला, त्यानंतर 2009 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सचं प्रतिनिधित्व करणारा डर्क नॅनेस आणि 2010 च्या आवृत्तीत तो ऑस्ट्रेलियाकडून खेळला.

हेही वाचा :

  1. लज्जास्पद... मोहम्मद सामीसह 'या' पाच गोलंदाजांनी एका षटकात टाकले सर्वाधिक चेंडू, एकानं तर दिल्या 77 धावा - Unique Cricket Records
  2. 10 धावंत संघ ऑलआउट, अवघ्या 5 चेंडूत खेळ खल्लास; कुठं झाला आंतरराष्ट्रीय T20 सामना? - ICC Mens T20 World
Last Updated : Sep 11, 2024, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details