T20 World Cup 2024 :आयसीसी टी-20 विश्वचषकाला 2 जूनपासून सुरुवात झालीय. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये चाहत्यांना स्फोटक थरार पाहायला मिळालाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली होत असलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघ खेळत आहेत. दरम्यान, आयसीसीनं या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमही जाहीर केलीय. यावेळी टी-20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावणाऱ्या संघाला ऐतिहासिक बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.
विश्वचषकात पैशांचा वर्षाव : 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीनं एकूण 11.25 दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम म्हणून देणारं आहे. यावेळी विजेत्या संघाला 2.45 दशलक्ष डॉलर्स दिले जातील. जे भारतीय रुपयाप्रमाणे सुमारे 20 कोटी रुपये आहेत. तर उपविजेत्या संघाला 1.28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयाप्रमाणे 10.50 कोटी इतकी आहे. 2022 मध्ये जेतेपद पटकवलेल्या इंग्लंड संघाला 13 कोटी बक्षीसाची रक्कम मिळाली होती. तर 6.44 कोटी रुपये उपविजेत्या पाकिस्तान संघाला देण्यात आले होते.