मँचेस्टर Harry Singh : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या मँचेस्टरमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पहिला सामना खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं एका युवा खेळाडूला मैदानात उतरवलं, ज्याची भारतात बरीच चर्चा होत आहे. हॅरी सिंग असं या खेळाडूचं नाव असून तो लँकेशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. या खेळाडूचं वय अवघं 20 वर्षे आहे. हॅरी सिंगचे वडील भारतीय संघाकडून खेळल्यामुळं या खेळाडूची भारतात चर्चा होत आहे. होय, आश्चर्यचकित होऊ नका, हॅरी सिंगच्या वडिलांचं नाव रुद्र प्रताप सिंग आहे, ज्यानं भारतासाठी 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
कोण आहेत हॅरी सिंगचे वडील : हॅरी सिंगचे वडील रुद्र प्रताप सिंग हा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. ज्यानं 24 सप्टेंबर 1986 रोजी भारतीय संघासाठी पदार्पण केलं. ते आपल्या कारकिर्दीत फक्त दोनच एकदिवसीय सामने खेळू शकला होता आणि दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले गेले होते. 24 सप्टेंबर 1986 रोजी पदार्पण केल्यानंतर, त्यानं त्याचा पुढील सामना 7 ऑक्टोबर 1986 रोजी खेळला, जो त्याचा शेवटचा सामना होता. रुद्रनं स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशासाठी 59 सामन्यांमध्ये 150 विकेट घेतल्या होत्या.