महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Live क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग, प्रेक्षकांना काढलं बाहेर; पाहा व्हिडिओ - FIRE IN BBL MATCH

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेली प्रसिद्ध T20 स्पर्धा, बिग बॅश लीगमध्ये सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लागल्यानं एक भयानक घटना घडली.

Fire in BBL Match
Live क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग (Screenshot From X)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 16, 2025, 5:04 PM IST

Updated : Jan 16, 2025, 5:14 PM IST

ब्रिस्बेन Fire in BBL Match :ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेली प्रसिद्ध T20 स्पर्धा, बिग बॅश लीगमध्ये सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आग लागल्यानं एक भयानक घटना घडली. ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामन्यादरम्यान, प्रसिद्ध ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये अचानक आगीच्या ज्वाळा उठू लागल्या, ज्यामुळं तिथं भीतीचं वातावरण निर्माण झालं. यामुळं सामनाही काही काळ थांबवावा लागला, तर जवळ बसलेल्या प्रेक्षकांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. तथापि, आगीचं भीषण रुप धारण होण्यापासून रोखण्यात आलं आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, ही दिलासादायक बाब होती.

कशी घडली घटना : आज गुरुवारी, 16 जानेवारी रोजी बिग बॅश लीग सामन्यात होबार्टच्या डावादरम्यान हा अपघात घडला. लक्ष्याचा पाठलाग करताना होबार्टच्या डावातील चौथं षटक सुरु होतं. दरम्यान, अचानक स्टेडियमच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. स्टेडियममधील डीजे बूथमध्ये ही आग लागली. स्टेडियममध्ये संगीत वाजवण्यासाठी आणि घोषणा देण्यासाठी बांधलेल्या या डीजे बूथमधील एक छोटीशी ठिणगी आगीत रुपांतरित झाली आणि तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी लगेचच ती विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर करण्यास सुरुवात केली.

प्रेक्षकांना काढलं बाहेर : या घटनेमुळं सामना ताबडतोब थांबवण्यात आला आणि त्या भागात बसलेल्या प्रेक्षकांनाही बाहेर काढण्यात आलं. आग फार मोठी नव्हती पण ती विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. खेळ काही काळ थांबवण्यात आला पण दिलासा मिळाला की आग मोठ्या स्वरुपात बदलू शकली नाही आणि अखेर आग आटोक्यात आली. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या कोणालाही कोणतीही इजा झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र ही आग कशी लागली याबद्दल सध्या परिस्थिती स्पष्ट नाही.

ब्रिस्बेन हीटची दमदार फलंदाजी : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ब्रिस्बेननं सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावांचा भक्कम स्कोअर केला. कर्णधार उस्मान ख्वाजानं फक्त 9 चेंडूत 23 धावा करत वेगवान सुरुवात केली. त्यानंतर मार्नस लाबुशेननं फक्त 44 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी केली, तर मॅट रेनशॉनं जलद 40 धावा केल्या आणि शेवटी टॉम अ‍ॅस्लॉपनंही 39 धावा केल्या.

हेही वाचा :

  1. महेंद्रसिंग धोनीच्या सन्मानार्थ सरकार 7 रुपयांचं नाणं आणणार? काय आहे सत्यता?
  2. सुपर किंग्जविरुद्ध घरच्या मैदानावर कॅपिटल्स पहिला सामना जिंकणार? फुकटात 'इथं' पाहा लाईव्ह मॅच
Last Updated : Jan 16, 2025, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details