महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा फलंदाज संघाबाहेर; 'या' खेळाडूचं इंग्लंड संघात पुनरागमन - ENG VS WI T20I SERIES

वेस्ट इंडिजविरुद्धची T20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ पूर्णपणे तयार दिसत आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी त्यांचा एक दिग्गज खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.

ENG vs WI T20I Series
इंग्लंड संघ (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 5, 2024, 3:49 PM IST

बार्बाडोस ENG vs WI T20I Series : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तिथं दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. यानंतर पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1 नं बरोबरीत आहेत. तर T20 मालिकेतील पहिला सामना 10 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आली आहे. इंग्लंडचा एक स्टार खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून T20 विश्वचषकानंतर तो इंग्लंडच्या संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून इंग्लंडचा व्हाईट बॉल फॉरमॅटचा कर्णधार जॉस बटलर आहे.

बटलरला दुखापत कशी झाली होती? :इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजला पोहोचला आहे. तिथं पोहोचताच त्यानं सरावाला सुरुवातही केली. T20 विश्वचषक 2024 पासून बटलरची त्याच्या संघाला खूप आठवण येत होती. मात्र दुखापतीमुळं बटलर गेल्या चार महिन्यांपासून आपल्या संघासाठी एकही सामना खेळू शकला नाही. वर्ल्ड कप दरम्यानच बटलरला दुखापत झाली होती. तरी त्यानं विश्वचषकातील सर्व सामने आपल्या संघासाठी खेळले आणि त्यानंतरच तो विश्रांतीला गेला.

बटलर दिसणार नव्या भूमिकेत : बटलरचं इंग्लंड संघात पुनरागमन झालं तरी फिल सॉल्ट विकेटकिपींग करणार आहे. संपूर्ण T20 मालिकेत बटलर फलंदाज म्हणून खेळणार आहे. अलीकडंच मी इंग्लंडसाठी फारसं काही केलं नाही, असं सॉल्टनं सांगितलं. पण मला विकेटकीपिंग आवडते. या क्षेत्रात मी संघासाठी सर्वाधिक योगदान देऊ शकतो, असं सॉल्ट म्हणाला. त्याच वेळी, बटलरनं सप्टेंबरमध्ये असंही म्हटलं होतं की जर त्याच्या यष्टीरक्षणाचा संघाला फायदा झाला तर तो त्यासाठीही तयार आहे. मी विकेटकीपिंग सोडण्यास तयार असून मिडऑफमध्ये खेळू शकतो, असं तो म्हणाला होता. मला ते कसे वाटते ते पहायचे आहे. माझ्या कर्णधारपदामुळं मदत झाली तर मी त्यासाठी तयार आहे.

मालिका 1-1 नं बरोबरीत : या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला 8 विकेटनं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्यांनी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं आणि इंग्लंडनं हा सामना 5 विकेटनं जिंकला. या सामन्यात संघाचा कर्णधार लियाम लिव्हिंग्स्टननं शानदार शतक झळकावलं. त्याच्या शतकामुळं त्याच्या संघानं 15 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह त्याच्या संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 06 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.

हेही वाचा :

  1. भारताविरुद्ध 'क्लीन स्वीप' करणाऱ्या कर्णधाराला संघात स्थान नाही; नव्या कॅप्टनसह न्यूझीलंडचा संघ जाहीर
  2. बिग बॅश लीगमध्ये आज दिग्गज भारतीय क्रिकेटपटू येणार आमनेसामने; 'इथं' पाहा 'फ्री'मध्ये लाईव्ह मॅच

ABOUT THE AUTHOR

...view details