महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मनू भाकर, डी. गुकेशला खेलरत्न तर मराठमोळ्या स्वप्नीलचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान - KHEL RATNA AWARD

भारतातील काही खेळाडूंना भारतीय क्रीडा जगतातील सर्वात मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Major Dhyan Chand Khel Ratna Award
मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे (President of India X Handle)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 17, 2025, 1:19 PM IST

Updated : Jan 17, 2025, 1:26 PM IST

नवी दिल्ली Major Dhyan Chand Khel Ratna Award :राष्ट्रपती भवनात आज 17 जानेवारी रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला, जिथं भारतातील काही प्रमुख खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डबल ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान केला. या दोन्ही खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान प्रदान करण्यात आला, जे त्यांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब आहे. मनू भाकरनं ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावलं आहे, तर डी गुकेशनं अलिकडेच बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकलं आहे.

हरमनप्रीतचाही सन्मान : याशिवाय, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यालाही देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. हरमनप्रीत सिंग टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होता आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्यानं संघाचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकीनं मोठं यश मिळवलं.

पॅरा खेळाडूंनाही मिळाला पुरस्कार : याच समारंभात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार यालाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रवीण कुमारनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं, जे त्याच्या समर्पणाचं आणि कठोर परिश्रमाचं प्रतीक आहे. त्याचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं आहे, विशेषतः जन्माशी संबंधित शारीरिक विकार असूनही त्यानं मिळवलेलं यश खूप प्रेरणादायी आहे.

32 खेळाडूंना अर्जुन अवार्ड : यावेळी 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी 17 खेळाडू पॅरा खेळाडू होते. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीगीर अमन सेहरावत, मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे, सांगलीचा सचिन खिल्लारी, सरबजोत सिंग आणि पुरुष हॉकी संघातील सदस्य जर्मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांचा समावेश होता. या खेळाडूंच्या यशावरुन हे सिद्ध होतं की भारतीय क्रीडा जगतात सतत सुधारणा करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत.

हेही वाचा :

  1. 'सुपरस्टार कल्चर' हटवण्यासाठी BCCI 'गंभीर'; खेळाडूंसाठी 10 सूत्री नियमावली
  2. 18 वर्षांनी होणाऱ्या ऐतिहासिक सामन्याच्या 14 तासाआधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर
Last Updated : Jan 17, 2025, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details