महाराष्ट्र

maharashtra

दिनेश कार्तिकनं 39व्या वर्षी बनवला अनोखा विक्रम; 'या' टी-20 लीगमध्ये सामील होणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू - Dinesh Karthik joins paarl royals

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 7, 2024, 7:13 PM IST

Dinesh Karthik : आयपीएलमध्ये दीर्घकाळ खेळणाऱ्या 39 वर्षीय कार्तिकनं यावर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होता. त्याला पर्ल रॉयल्सनं SA20 साठी करारबद्ध केलं आहे. या लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

dinesh karthik
दिनेश कार्तिक (ANI Photo)

नवी दिल्ली Dinesh Karthik : भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला दक्षिण आफ्रिका टी 20 लिगच्या तिसऱ्या सत्रासाठी पर्ल रॉयल्सनं करारबद्ध केलं आहे. यासह कार्तिक पुढील वर्षी 9 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तो पुन्हा एकदा आपली फलंदाजी दाखवण्यास सज्ज झाला आहे. पर्ल रॉयल्सनं सोशल मीडियावर यासंर्दभात पोस्ट करत माहिती दिली आहे.

आरसीबीचा फलंदाजी प्रशिक्षक : आयपीएलमध्ये प्रदीर्घ काळ खेळलेल्या 39 वर्षीय कार्तिकनं या वर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर त्याची आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मेंटॉर तसंच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

2022 मध्ये खेळला शेवटचा भारताकडून सामना : कार्तिकनं आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून शेवटचा स्पर्धात्मक टी 20 सामना खेळला होता. 2024 च्या मोसमात त्यानं 14 सामन्यांत 187.36 च्या स्ट्राइक रेटनं 326 धावा केल्या. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकादरम्यान कार्तिकनं भारताकडून शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

काय म्हणाला कार्तिक : एका दिवसापूर्वीच करारबद्ध झालेला कार्तिक म्हणाला, 'मला खूप अनुभव, गुणवत्ता आणि क्षमता असलेल्या पर्ल रॉयल्स संघात सामील होताना खूप आनंद होत आहे. मी नक्कीच या संघात सामील होण्यासाठी आणि या हंगामात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.'

आयपीएलच्या धर्तीवर सुरु झाली लीग : आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून टी 20 लीग सुरु झाली. आयपीएलच्याच मालकांनी या लीगचे सर्व संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सनं पर्ल संघ विकत घेतला. यासह एमआय केप टाऊन, जॉबर्ग सुपर किंग्स, डर्बन सुपर जायंट्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप या संघांचा या लीगमध्ये समावेश आहे.

हेही वाचा :

  1. 'हिटमॅन'नं दुसऱ्या वनडेत दोन धावा काढताच रचला इतिहास; 'द वॉल'ला टाकलं मागे - Rohit Sharma
  2. यजमानच ठरले वरचढ! श्रीलंकेनं भारताला 32 धावांनी चारली धूळ, 'हिटमॅन'ची खेळी व्यर्थ - SL vs IND 2nd ODI

ABOUT THE AUTHOR

...view details