ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; सीबीआय चौकशीला पूजाच्या कुटुंबीयांचा विरोध, कोणतीही तक्रार नसल्याचं केलं स्पष्ट - Pooja Chavan Suicide Case - POOJA CHAVAN SUICIDE CASE

Pooja Chavan Suicide Case : पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण यांनी आपली कोणतीही तक्रार नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीला विरोध केला.

Pooja Chavan Suicide Case
पूजा चव्हाण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 10:43 AM IST

Updated : Sep 19, 2024, 11:29 AM IST

मुंबई Pooja Chavan Suicide Case : पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला. फेब्रुवारी 2021 मध्ये पुण्यातील पूजा चव्हाण हिचा तिच्या घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. त्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करुन त्या प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी, अशी मागणी केली. मात्र या प्रकरणी आपली कोणतीच तक्रार नसल्याचा दावा पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण आणि तिच्या चार बहिणींना या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर कोणतीही शंका नाही, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडं देण्याची काय आवश्यकता आहे, असा सवालही यावेळी वकिलांनी केला.

पूजा चव्हाण प्रकरणात कोणतीही तक्रार नाही- लहू चव्हाण : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी दिवंगत पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणात आपली कोणतीही तक्रार नाही. सीबीआय चौकशी करण्याची आपली कोणती मागणी नसल्याचं त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं. राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ आणि पुणे पोलिसांची बाजू मांडणारे उच्च न्यायालयाचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या याचिकादारांच्या मागणीला विरोध केला. याप्रकरणी महानगर दंडाधिकारी यांनी त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकडं अनेकदा फेटाळून लावल्याच्या बाबीकडं त्यांनी खंडपीठाचं लक्ष वेधलं.

चित्रा वाघ यांनी याचिका दाखल करण्यात त्यांचा काय हेतू आहे ? : पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या अपघाती मृत्यूच्या नोंदीला पूजाच्या वडिलांचा विरोध नाही. मग चित्रा वाघ यांनी ही याचिका दाखल करण्यामध्ये त्यांचा काय हेतू आहे, असा प्रश्न पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांची बाजू मांडणारे वकील प्रणव बडेका यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला. पूजाचे वडील तसेच तिच्या चारही बहिणींना पुणे पोलिसांबद्दल आणि त्यांच्या तपासाबद्दल या प्रकरणात काही आक्षेप नाही. असं असताना हे प्रकरण सीबीआयकडं देण्याची काय गरज आहे, असा प्रश्न वकील बडेका यांनी उपस्थित केला. तर चित्रा वाघ यांची बाजू मांडणारे वकील अनिल साखरे यांनी याप्रकरणी काही क्लिप्स न्यायालयासमोर सादर केल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामध्ये पूजा आणि राज्याच्या राजकारणातील उच्चपदस्थ व्यक्तीमध्ये काहीतरी घडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मृत्यूसमयी पूजा गरोदर असल्याची चर्चा असल्यानं तिच्या आत्महत्या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणात आणखी काही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यांचे वकील आजच्या सुनावणीला उपस्थित नसल्यानं या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही; पालकांनी नोंदवला जबाब
  2. Sanjay Rathod Cleancheat Report संजय राठोड यांचा क्लीनचिट अहवाल आला समोर
  3. पूजा चव्हाण प्रकरण : बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करू, कुटुंबीयांचा इशारा

Last Updated : Sep 19, 2024, 11:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.