नवी दिल्ली Punjab Kings Coach IPL 2025 : आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वी प्रशिक्षकांचा खेळाडूंसह एका संघातून दुसऱ्या संघात जाण्याचा गोंधळ सुरुच आहे. आता पंजाब किंग्सनं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी रिकी पाँटिंगचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. पंजाब किंग्सनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे.
𝐏𝐔𝐍TER is 𝐏𝐔𝐍JAB! 🦁♥️
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 18, 2024
🚨 Official Statement 🚨
Ricky Ponting joins Punjab Kings as the new Head Coach! #RickyPonting #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/DS9iAHDAu7
रिकी पाँटिंग पंजाबचा नवा कोच : प्राप्त वृत्तानुसार, रिकी पाँटिंगनं पंजाब किंग्जसोबत अनेक वर्षांचा करार केला आहे. पाँटिंग उर्वरित कोचिंग स्टाफबाबत अंतिम निर्णय घेईल असंही या अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, पंजाब किंग्सने गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. माजी ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटर गेल्या सात हंगामात फ्रँचायझीचा सहावा मुख्य प्रशिक्षक असेल. गेल्या हंगामात पंजाब संघ नवव्या स्थानावर होता. पुढील मोसमासाठी कायम ठेवता येईल अशा खेळाडूंची निवड करणे हे पॉन्टिंगसमोर मोठं आव्हान असेल.
अनेक वर्ष प्रशिक्षक म्हणून काम : हर्षल पटेल हा शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्यासह पंजाब किंग्जमध्ये गेल्या वर्षी आयपीएलचा स्टार परफॉर्मर होता. पंजाब किंग्सनं 11.8 कोटी रुपयांत घेतलेल्या हर्षल पटेलनं पर्पल कॅपही जिंकली. पाँटिंगनं आयपीएल 2015 मध्ये आपल्या कोचिंग कारकिर्दीला सुरुवात केली आणि दोन वर्षे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन दिग्गजानं आयपीएल 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) चं मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला आणि संघानं 2019 ते 2021 दरम्यान सलग तीन वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. 49 वर्षीय पाँटिंगनं जुलैमध्ये आयपीएल 2024 नंतर डीसी सोबतचा कार्यकाळ संपवला.
हेही वाचा :