रावळपिंडी AUS vs SA 7th Match Live : 25 फेब्रुवारीचा दिवस 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील एका मोठ्या सामन्याचा साक्षीदार होणार आहे. कारण हा सामना क्रिकेटच्या दोन मोठ्या संघांमधील आहे. ते म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका. दोन्ही संघ आपापल्या गटात अपराजित आहेत आणि आता त्यांचं लक्ष्य एकमेकांना हरवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत पुढं जाण्याचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच एकमेकांसमोर येत आहेत. आयसीसी स्पर्धांमध्ये हे दोघे चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. याआधी खेळलेल्या तीन सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियानं दोनदा विजय मिळवला आहे. तर 1 सामना बरोबरीत सुटला.
पावसामुळं नाणेफेकीला विलंब :दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात पाऊस सुरु असल्यानं नाणेफेकीला विलंब झाला आहे. सध्या संपुर्ण मैदान हे अंडर कव्हर्स आहे. जर दुर्दैवानं हा सामनामुळं रद्द झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येईल. त्यामुळं ग्रुप ब चं समीकरण बदलण्याची शक्यात आहे. सध्या दोन्ही संघांचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये बसलेले असून पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.
दोन्ही संघांची मजबूत फलंदाजी : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांकडे फलंदाजीचे विभाग खूप मजबूत आहेत आणि त्यामुळं हा सामना खूप मनोरंजक बनू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दोघंही हा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेनं एक मजबूत पाऊल टाकू इच्छितात. दुखापतींमुळं ऑस्ट्रेलियाचे अनेक प्रमुख खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाहीत. परंतु लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध ज्या पद्धतीनं त्यांनी विक्रमी लक्ष्य गाठलं त्यावरुन हे स्पष्ट झालं आहे की आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाला कमी लेखणं ही एक मोठी चूक असेल.
वनडेमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : दोन्ही संघ वनडे सामन्यांमध्ये 110 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेनं 55 तर ऑस्ट्रेलियानं 51 सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले आहेत आणि एकाचा निकाल लागला नाही, यावरुन हे संघ गेल्या काही वर्षांत किती समान आहेत हे दिसून येते. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनं अलिकडच्या काळात काही उच्च-स्कोअरिंग सामने खेळले आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिकेनं द्विपक्षीय मालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. परंतु ऑस्ट्रेलियानं विश्वचषकातील सामन्यात आफ्रिकेला पराभूत केलं होतं.
हेही वाचा :
- 'फ्री'मध्ये सचिनची बॅटींग कशी पाहायची? इंग्लंडविरुद्ध उतरणार मैदानात, वाचा सविस्तर
- WPL च्या इतिहासात पहिल्यांदाच झाली सुपर ओव्हर, 180 धावा काढुनही RCB चा घरात पराभव