महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय संघ 3 वर्षांनी कांगारुंना पराभव करण्यात यशस्वी होणार? निर्णायक सामना 'इथं' पाहा लाईव्ह - AUSW VS INDW 3RD ODI LIVE IN INDIA

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यात यजमान संघानं 2-0 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

AUSW vs INDW 3rd ODI Live Streaming
भारतीय महिला क्रिकेट संघ (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 10, 2024, 6:15 PM IST

पर्थ AUSW vs INDW 3rd ODI Live Streaming :ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज बुधवार, 11 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थच्या WACA इथं खेळवला जाईल.

यजमानांची मालिकेत विजयी आघाडी :पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं भारतीय महिला संघाचा 5 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघानं पाहुण्या संघाचा 122 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा या मालिकेत भारताचा सफाया करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे.

दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड काय : वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ 55 वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं 55 पैकी तब्बल 45 वनडे सामने जिंकले आहेत. तर भारतानं केवळ 10 सामने जिंकले आहेत. यावरुन ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे भारतीय महिला संघानं शेवटच्या वेळी 26 सप्टेंबर 2021 मध्ये विजय मिळवला होता. त्यामुळं आता तीन वर्षांनी भारतीय संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

खेळपट्टीचा अहवाल कसा : पर्थच्या WACA मैदानाचा पृष्ठभाग वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त वेग आणि उसळी देईल. त्यामुळं नवीन चेंडूवर वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील. जसजसा चेंडू जुना होतो तसतसे वेगवान गोलंदाज लेन्थ मागे घेऊ शकतात आणि हार्ड लेन्थ बॉलिंग आणि बाउन्सरसह फलंदाजांची चाचणी घेऊ शकतात. अशा स्थितीत फलंदाजांना सुरुवातीला सावधपणे खेळावं लागेल. फिरकीपटूंनाही इथं काही मदत मिळू शकते. नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. मात्र, प्रथम फलंदाजी करुन सन्मानजनक धावसंख्या उभारल्यास या विकेटवर विजयही मिळू शकतो.

पर्थ इथं वनडे सामन्यांची आकडेवारी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पर्थच्या WACA मैदानावर आतापर्यंत एकूण 86 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 43 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 42 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला आहे.

ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यातील तिसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?

ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यातील तिसरा वनडे सामना बुधवार, 11 डिसेंबर रोजी WACA पर्थ इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 8:50 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.

ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला यांच्यातील तिसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?

ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाईल. या मालिकेचं लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात डिस्नी+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

ऑस्ट्रेलिया महिला संघ : बेथ मूनी (यष्टिरक्षक), जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, ॲशले गार्डनर, ॲनाबेल सदरलँड, अलाना किंग, सोफी मोलिनक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वेअरहम, किम गर्थ.

भारतीय महिला संघ : प्रिया पुनिया, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), अरुंधती रेड्डी, राधा यादव, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकूर सिंग, तितास साधू, सायमा ठाकोर, मिन्नू मणी, तेजल हसबनीस, उमा छेत्री, हरलीन देओल

हेही वाचा :

  1. भारतीय संघ फायनलमध्ये कसं जाणार? 'हे' आहेत चार 'सिनॅरिओ'
  2. जय शहा आयसीसीचे चेअरमन बनताच मोठी कारवाई; मोठ्या क्रिकेट लीगवर बंदी

ABOUT THE AUTHOR

...view details