ब्रिस्बेन AUS vs IND 3rd Test Live Streaming : ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबर (शनिवार) पासून गाबा, ब्रिस्बेन इथं खेळवला जाईल.
मालिका 1-1 नं बरोबरीत :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघानं पर्थमध्ये नेत्रदीपक विजयाची नोंद केली, तर ॲडलेडमध्ये यजमान ऑस्ट्रेलियानं भारताचा दहा गडी राखून पराभव केला. गाबासारख्या अवघड मैदानावरील तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहित शर्मा आणि भारतीय संघाला आपल्या रणनीतींवर फेरविचार करावा लागणार आहे.
या कसोटीकडे लक्ष : दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पर्थमध्ये संघानं उत्कृष्ट फलंदाजी दाखवली असताना ॲडलेडमध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळालं. कर्णधारपदातील त्रुटी आणि गोलंदाजीतील अननुभवीपणामुळं संघाचं मोठं नुकसान झालं. दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाची कामगिरी आत्मविश्वासानं भरलेली होती. स्टार्क आणि कमिन्सची गोलंदाजी आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकानं भारताला पूर्णपणे बॅकफूटवर आणले. आता गाबा येथील तिसऱ्या कसोटीत उत्साह शिगेला असेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 109 कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यात ऑस्ट्रेलियानं 46 सामने जिंकले आहेत, तर भारतानं 33 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील 29 सामने अनिर्णित राहिले. तर एक सामना बरोबरीत संपला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (1996-2023) मध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड : 1996 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हणून नावाजलेल्या, या मालिकेनं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटमधील उत्साह आणि स्पर्धा नवीन उंचीवर नेली. आतापर्यंत झालेल्या 58 सामन्यांपैकी भारतानं 25, तर ऑस्ट्रेलियानं 23 वेळा विजय मिळवला आहे. तथापि, ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताची कामगिरी आव्हानात्मक आहे, जिथं त्यांनी 28 पैकी फक्त 7 कसोटी सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना कधी आणि कुठं खेळवली जाईल?