कॅनबेरा AUSW vs ENGW 2nd T20I Live Streaming : महिला अॅशेस 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज 23 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल इथं खेळवला जाईल. पहिल्या T20 सामन्यात यजमान संघानं इंग्लंडचा 57 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियन संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. परणामी दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
पहिल्या सामन्यात काय झालं : 20 जानेवारी रोजी सिडनीत झालेल्या पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाईटनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 198 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकांत 199 धावा करायच्या होत्या, मात्र लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरला आणि 16 षटकांत फक्त 141 धावांवर सर्वबाद झाला.
दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड रोकॉर्ड काय : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा असल्याचं दिसून येतं. दोन्ही संघांनी आतापर्यंत 41 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. यात ऑस्ट्रेलियन संघानं 24 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. तर, 7 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
कॅनबेराची खेळपट्टी कशी असेल : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल इथं खेळला जाईल. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा मनुका ओव्हलमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. मनुका ओव्हल फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली मदत करते. या मैदानावर सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळू शकते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगला उसळी मिळू शकतो. पॉवरप्लेमध्ये जलद गोलंदाज लवकर स्विंगचा फायदा घेऊ शकतात. या ट्रॅकवर प्रथम गोलंदाजी करणे हा योग्य निर्णय ठरु शकतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात दुसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?