शारजाह (युएई) Afghanistan vs South Africa 3rd ODI Live Streaming : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यात प्रथमच वनडे फॉरमॅटमध्ये तीन सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळवली जात आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघानं आपल्या खेळानं सर्वांना चकित केलं आणि पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला. यासह त्यांनी तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 नं खिशात घातली आहे. आज या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे.
अफगाणिस्ताननं रचला इतिहास : दोन्ही संघांमधील दुसरा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यात अफगाणिस्तान संघानं दक्षिण आफ्रिकेवर 177 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका जिंकून आणखी एक मोठा अपसेट निर्माण केला. विशेष म्हणजे आतापर्यंत अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकही मालिका जिंकलेली नव्हती. मात्र आता त्यांनी ही मालिका जिंकत त्यांनी इतिहास रचला आहे. आता अफगाणिस्तानला मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्लीन स्वीप करायचा आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मागील दोन्ही पराभव विसरुन या सामन्यात पुनरागमन करुन प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळं हा सामना कुठं बघता येईल, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवार, 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना किती वाजता सुरु होईल?