लाहोर AFG vs ENG 8th Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आठवा सामना आज 26 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता लाहोरमधील गद्दाफी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
पहिल्या सामन्यात दोन्ही संघात पराभव : इंग्लंड आणि अफगाणिस्तानला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं हा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा झाला आहे. ग्रुप बी मध्ये, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानं त्यांचे पहिले सामने जिंकले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचं वर्चस्व आता भूतकाळात जमा झालं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध, जर त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तर त्यांच्या गोलंदाजांनी निराशा केली कारण त्यांना 350 पेक्षा जास्त धावसंख्येचा बचाव करता आला नाही.
अफगाणिस्तानला विजयाची गरज :अफगाणिस्तानच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी निराशा केली आणि त्यांचे फलंदाजही अपयशी ठरले ज्यामुळं त्यांच्या संघाला 107 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तान संघात जवळजवळ तेच खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या वर्षी T20 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. जर अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांच्या खेळाडूंना एकजुटीनं कामगिरी करावी लागेल.
लाहोरची खेळपट्टी कशी असेल :लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते, जिथं स्ट्रोक खेळाडूंना चांगला उसळी आणि वेग मिळतो. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला काही मदत मिळू शकेल, तर फिरकी गोलंदाज मधल्या षटकांमध्ये प्रभावी ठरु शकतील. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे 280-300 आहे, जी उच्च-स्कोअरिंग स्पर्धा दर्शवते. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्यानं, नाणेफेक जिंकणारे संघ धावांचा पाठलाग करण्यास प्राधान्य देऊ शकतात.
हेड-टू-हेड रेकॉर्ड : या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्तान आणि इंग्लंड वनडे स्वरुपात फक्त तीन वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी इंग्लंडनं दोनदा विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्ताननं एकदा विजय मिळवला आहे. आतापर्यंत, या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमध्ये नेहमीच रोमांचक सामना पाहायला मिळाला आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना या सामन्यातही एका रोमांचक सामन्याची अपेक्षा असेल.
वनडे विश्वचषकात इंग्लंडचा पराभव : इंग्लंड आणि अफगाणिस्तानचे संघ शेवटच्या वेळी 2023 च्या वनडे विश्वचषकात आमनेसामने आले होते. त्या सामन्यात अफगाण संघानं इंग्लंडला हरवून मोठा अपसेट निर्माण केला. त्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत 284 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लिश संघ 215 धावांवर सर्वबाद झाला. त्या सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयाचा नायक मुजीब उर रहमान होता.
अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा आठवा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?