शारजाह AFG vs BAN 1st ODI Live Streaming : अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज 6 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. तिन्ही वनडे सामने शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने एकदिवसीय मालिका पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघ पुन्हा मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानला पराभूत करणं हे बांगलादेशसाठी मोठं आव्हान असेल. दुसरीकडे मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 अशी कसोटी मालिका गमावल्यानंतर बांगलादेश संघ या मालिकेत प्रवेश करेल. या वनडे मालिकेसाठी बांगलादेशनं आपल्या संघात नवीन वेगवान गोलंदाज नाहिद राणा आणि यष्टीरक्षक जॅकर अली यांचा समावेश केला आहे. झाकीर हसन आणि नसुम अहमद यांचंही एका वर्षानंतर संघात पुनरागमन झालं आहे.
दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका :ही वनडे मालिका अफगाणिस्तान आणि बांगलादेशसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे ती आता फार दूर नाही. गेल्या वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आतापर्यंत 16 वेळा वनडे सामन्यांमध्ये आमनेसाममने आले आहेत. ज्यात बांगलादेशचा वरचष्मा दिसत आहे. बांगलादेशनं 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्ताननंही 6 सामने जिंकले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीची स्पर्धा होते. मात्र, बांगलादेशचा रेकॉर्ड चांगला असल्यानं ते अधिक मजबूत दिसत आहेत.
खेळपट्टी कशी असेल :शारजाहच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संथ वळणं घेणाऱ्या गोलंदाजांचा वरचष्मा असतो. मात्र सीमारेषा लहान असल्यानं त्याचा फायदा फलंदाजही घेऊ शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना : 06 नोव्हेंबर
- दुसरा वनडे सामना : 09 नोव्हेंबर
- तिसरा वनडे सामना : 11 नोव्हेंबर
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुशफिकर रहीमनं अफगाणिस्तानविरुद्ध 15 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 35.30 च्या सरासरीनं 459 धावा केल्या आहेत. या कालावधीत मुशफिकुर रहीमनं 4 अर्धशतकं झळकावली असून 86 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज :