कोलंबो AFG vs SL Only Test : राजकारणात काका पुतण्यात राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु क्रिकेटमध्ये काका-पुतण्यातील खिलाडूवृत्ती दिसून आली. त श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पुतण्यानंच आपल्या काकांना पदार्पणाची कसोटी कॅप दिलीय. जेव्हा इब्राहिम झादराननं कसोटी पदार्पणासाठी आपले काका नूर अली झादरान यांना कॅप दिली. हा अनोखा पराक्रम अफगाणिस्तान संघात दिसला.
काका-पुतण्या आले सलामीला :पदार्पणाची कॅप काकाकडं दिल्यानंतर इब्राहिम झादरान त्याच्यासोबत सलामीली फलंदाजीला आला. मात्र, पहिल्या डावात दोघांमध्ये कोणतीही भागीदारी होऊ शकली नाही. कारण डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर इब्राहिम झादरान खातं न उघडता बाद झाला. पण दुसऱ्या डावात या काका-पुतण्यानं 258 चेंडूत 106 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
22 वर्षाच्या पुतण्यानं 35 वर्षाच्या काकांना दिली पदार्पणाची कॅप : अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झादरान 22 वर्षांचा आहे. तर कसोटी पदार्पण करणारा त्याचा काका 35 वर्षांचा आहे. जेव्हा एखादा खेळाडू त्याच्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या खेळाडूला पदार्पणाची कॅप देतो, असं क्रिकेटच्या मैदानावर घडणं फार दुर्मिळ आहे. इब्राहिम झादराननं आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले आहेत. तर, आपली पहिली कसोटी खेळणारा नूर अली झादरान अफगाण संघासाठी 51 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय.
- पदार्पणाच्या कसोटीत नूरची कामगिरी कशी आहे :पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या नूर अली झादराननं पहिल्या डावात 46 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीनं 31 धावा केल्या. यानंतर अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्यानं 136 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 47 धावा केल्या. मात्र पदार्पणाच्या कसोटीत त्याला अर्धशतक झळकावता आलंय.
मर्यादित षटकांच्या सामन्यांत नूरची कारकीर्द कशी : नूर अली झादराननं 2009 मध्ये अफगाणिस्तानसाठी पदार्पण केलं होत. परंतु, जवळपास 15 वर्षांनंतर 2024 मध्ये त्यानं कसोटीत पदार्पण केलंय. आत्तापर्यंत नूरनं 51 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 50 डावांमध्ये नूरनं 24.81 च्या सरासरीनं 1216 धावा केल्या आहेत. तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 23 डावांमध्ये 27.13 च्या सरासरीनं तसंच 101.87 च्या स्ट्राइक रेटनं 597 धावा केल्या आहेत.
हेही वाचा :
- विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघासाठी 'शुभ'मन दिन; साहेबांना विजयासाठी विक्रमी आव्हान
- जैस्वालच्या द्विशतकानंतर बुमराहची 'यशस्वी' गोलंदाजी; दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडं भक्कम आघाडी
- भारतीय पॅरालिम्पिक समितीचं क्रीडा मंत्रालयाकडून तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?