जेद्दाह IPL Auction Sold Players Full List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया इथं होत आहे. 24 नोव्हेंबर (रविवार) मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी देशी-विदेशी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. यात 72 खेळाडूंची विक्री झाली. काही खेळाडूंची निराशाही झाली. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबर (सोमवार) रोजी लिलाव होणार असून यामध्ये जास्तीत जास्त 132 खेळाडूंची विक्री होणार आहे. त्यांना खरेदी करण्यासाठी सर्व 10 संघांच्या पर्समध्ये अद्याप एकूण 173.55 कोटी रुपये शिल्लक आहेत. (full list of sold players auction)
पंत ठरला सर्वात महागडा : पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंना खरेदी करण्यात आलं. ज्यावर फ्रँचायझींनी तब्बल 467.95 कोटी रुपये खर्च केले. तर 12 खेळाडूंना कोणत्याही संघानं खरेदी करण्यास रस दाखवला नाही. लिलावाच्या पहिल्याच दिवशी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं इतिहास रचला. पंत आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा (expensive players in auction) खेळाडू ठरला आहे. पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं (LSG) 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. पंतनं श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला, ज्याला पंजाब किंग्जनं (PBKS) 26.75 कोटी रुपयांना त्याच्या 5 मिनिटांआधी लिलावात विकत घेतलं. या मेगा लिलावात 577 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी :
- अर्शदीप सिंग (भारत) : 18 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) : 10.75 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- श्रेयस अय्यर (भारत) : 26.75 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- जोस बटलर (इंग्लंड) : 15.75 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : 11.75 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- ऋषभ पंत (भारत) : 27 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- मोहम्मद शमी (भारत) : 10 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) : 7.5 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 1.5 कोटी)
- युझवेंद्र चहल (भारत) : 18 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- मोहम्मद सिराज (भारत) : 12.25 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) : 8.75 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- केएल राहुल (भारत) : 14 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- हॅरी ब्रूक (इंग्लंड) : 6.25 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका) : 2 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड) : 6.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- राहुल त्रिपाठी (भारत) : 3.40 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 75 लाख रुपये)
- जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया) : 9 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- हर्षल पटेल (भारत) : 8 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- रचिन रवींद्र (न्यूझीलंड) : 4 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 1.5 कोटी)
- रविचंद्रन अश्विन (भारत) : 9.75 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- व्यंकटेश अय्यर (भारत) : 23.75 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- मार्कस स्टॉइनिस (ऑस्ट्रेलिया) : 11 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया) : 3.40 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) : 4.2 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) : 3.60 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- फिल सॉल्ट (इंग्लंड) : 11.50 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- रहमानउल्ला गुरबाज (अफगाणिस्तान) : 2 कोटी रुपये, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- इशान किशन (भारत) : 11.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- जितेश शर्मा (भारत) : 11 कोटी रुपये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) : 12.50 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- प्रसिद्ध कृष्णा (भारत) : 9.50 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- आवेश खान (भारत) : 9.75 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- एनरिक नॉर्सिया (दक्षिण आफ्रिका) : 6.50 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- जोफ्रा आर्चर (इंग्लंड) : 12.50 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- खलील अहमद (भारत) : 4.80 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- टी. नटराजन (भारत) : 10.75 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) : 12.50 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- महिश तिक्षाना (श्रीलंका) : 4.40 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- राहुल चहर (भारत) : 3.20 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- ॲडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया) – २.४० कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- वानिंदू हसरंगा (श्रीलंका) : 5.25 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- नूर अहमद (अफगाणिस्तान) : 10 कोटी रुपये, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी रुपये)
- अथर्व तायडे (भारत) : 30 लाख, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 30 लाख)
- नेहल वढेरा (भारत) : 4.20 कोटी रुपये, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत : 30 लाख रुपये)
- अंगकृष्ण रघुवंशी (भारत) : 3 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स (आधारभूत किंमत : 35 लाख)
- करुण नायर (भारत) : 50 लाख, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- अभिनव मनोहर (भारत) : 3.20 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 30 लाख)
- निशांत सिंधू (भारत) : 30 लाख, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- समीर रिझवी (भारत) : 95 लाख, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- नमन धीर (भारत) : 5.25 कोटी रुपये, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 30 लाख रुपये)
- अब्दुल समद (भारत) : 4.20 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- हरप्रीत ब्रार (भारत) : 1.50 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- विजय शंकर (भारत) : 1.20 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 30 लाख)
- महिपाल लोमरोर (भारत) : 1.70 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 50 लाख)
- आशुतोष शर्मा (भारत) : 3.80 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 30 लाख रुपये)
- कुमार कुशाग्र (भारत) : 65 लाख, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- रॉबिन मिन्झ (भारत) : 65 लाख, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- अनुज रावत (भारत) : 30 लाख, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- आर्यन जुयाल (भारत) : 30 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- विष्णू विनोद (भारत) : 95 लाख, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- रसिक सलाम दार (भारत) : 6 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 30 लाख)
- आकाश मधवाल (भारत) : 1.20 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- मोहित शर्मा (भारत) : 2.20 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 50 लाख)
- विजयकुमार वैशाख (भारत) : 1.80 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- वैभव अरोरा (भारत) : 1.80 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- यश ठाकूर (भारत) : 1.60 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- सिमरजीत सिंग (भारत) : 1.50 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत : 30 लाख)
- सुयश शर्मा (भारत) : 2.60 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 30 लाख)
- कर्ण शर्मा (भारत) : 50 लाख, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 50 लाख)
- मयंक मार्कंडे (भारत) : 30 लाख, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- कुमार कार्तिकेय (भारत) : 30 लाख, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 30 लाख)
- मानव सुथार (भारत) : 30 लाख, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 30 लाख)