महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न भूतो न भविष्यति... 13 वर्षीय वैभवनं दुबईत मैदानात पाऊल ठेवताच रचला इतिहास; आतापर्यंत कोणालाच जमलं नाही - VAIBHAV SURYAVANSHI AGE NEWS

13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं भारताच्या अंडर-19 संघासाठी वनडे पदार्पण केलं आहे यासह त्यानं एक विशेष विक्रमही केला आहे.

Vaibhav Suryavanshi
वैभव सूर्यवंशी (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 30, 2024, 5:18 PM IST

दुबई Vaibhav Suryavanshi : बिहारचा 13 वर्षीय खेळाडू, वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापासून चर्चेत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाला राजस्थान रॉयल्सनं लिलावात 1 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतलं. आयपीएलसाठी निवड झालेला वैभव हा सर्वात तरुण खेळाडू आहे. तो सध्या UAE मध्ये पुरुष अंडर-19 आशिया कप 2024 खेळत आहे. या सामन्यातील पहिल्याच सामन्यात त्यानं एक खास विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, फलंदाज म्हणून त्याला या सामन्यात विशेष काही करता आलं नाही.

13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा विशेष रेकॉर्ड : वैभव सूर्यवंशीला दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अंडर-19 क्रिकेटमधला हा त्याचा पहिला वनडे सामना होता, याआधी तो भारताकडून कसोटी खेळला होता. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यासाठी मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशीनं इतिहास रचला. वास्तविक, वैभव सूर्यवंशी आता भारताकडून अंडर-19 वनडे खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या 13 वर्षे 248 दिवसात त्यानं हा सामना खेळला. यापूर्वी हा विक्रम पियुष चावलाच्या नावावर होता. पियुष चावलानं वयाच्या 14 वर्षे आणि 311 दिवसांत भारतीय अंडर-19 संघासाठी वनडे सामना खेळला.

फलंदाजीत ठरला अपयशी :मात्र, हा पदार्पणाचा सामना वैभव सूर्यवंशीसाठी काही खास नव्हता. या सामन्यात वैभव सलामीवीर म्हणून खेळला, पण त्याला 9 चेंडूत केवळ 1 धाव करता आली आणि त्यानं त्याची विकेट गमावली. चेंडू बाहेर जाताच वैभवनं त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं तो यष्टिरक्षकाकडे झेलबाद झाला. म्हणजेच पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी त्याच्या चाहत्यांच्या आणि आयपीएल संघाच्या अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत झळकावलं होतं शतक : वैभव सूर्यवंशीनं गेल्या महिन्यातच ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली होती. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 64 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या होत्या. या काळात त्यानं अवघ्या 58 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. या स्फोटक खेळीत त्यानं 14 चौकार आणि 4 षटकार मारले. यासह तो अंडर-19 कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला होता. याच वर्षी, वैभव सूर्यवंशीनं बिहार क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या रणधीर वर्मा अंडर-19 वनडे स्पर्धेत त्रिशतकही झळकावलं होतं. अंडर-19 स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिलंच त्रिशतक ठरलं होतं.

हेही वाचा :

  1. AUS vs IND 2nd Test: दिग्गज खेळाडू दुसऱ्या कसोटीपूर्वी जखमी, संघात दोन नव्या खेळाडूंना स्थान
  2. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना सुरु असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना अटक, क्रिकेट विश्वात खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details