महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (Etv Bharat MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 3:53 AM IST

मेष : या आठवड्यात आपल्या वाणीचा एक वेगळाच प्रभाव असेल, ज्यामुळं आपण इतरांकडून सर्व कामे पूर्ण करवून घेण्यात यशस्वी व्हाल. एखादा मोठा निर्णय घेताना आपल्या भावंडांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. ज्या व्यक्ती रोजगाराच्या शोधात आहेत, त्यांना ह्या आठवड्यात अपेक्षित संधी मिळेल. परदेशाशी संबंधित कामे करणाऱ्यांना मोठा लाभ होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात संततीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळाल्यानं घरात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होईल. भविष्यात लाभदायी ठरतील अशा काही योजना तयार कराल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण जर एखाद्या व्यक्ती समोर आपल्या प्रेमाची कबुली दिलीत तर त्या व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. जे आधी पासूनच प्रेमात आहेत ते आपल्या प्रेमिकेसह सुखद क्षण घालवू शकतील. दांपत्य जीवनातील प्रेम व सामंजस्य टिकून राहील. प्रकृती सामान्यच राहील.

वृषभ: हा आठवड्यात कार्यक्षेत्री आपल्या कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठांचे व कनिष्ठांचे भरपूर सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यास सुख-सुविधांच्या वस्तूंच्या खरेदीत व फिरण्यात जास्त पैसे खर्च होण्याची संभावना असल्यानं आपणास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणताही निर्णय विचारांतीच घ्यावा. ह्या दरम्यान जमीन-जुमला व पैतृक संपत्तीशी संबंधितबाबी आपल्या त्रासास कारणीभूत होऊ शकतात. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करताना खूपच सावध राहावे लागेल. आपणास जर एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर त्याच्याशी संबंधित नियम व अटी पूर्णतः वाचून निर्णय घ्यावा, अन्यथा नंतर समस्यांना सामोरे जावे लागण्याची संभावना आहे. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखावह होईल.

मिथुन : आठवड्याच्या सुरूवातीस कारकिर्दीच्या किंवा व्यापाराच्या निमित्तानं दूरवरचे किंवा जवळचे प्रवास करावे लागू शकतात. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत प्राप्त होतील. असं असलं तरी प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढेल. ज्या व्यक्ती रोजगाराच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना ह्या आठवड्यात सुवर्ण संधी मिळेल. कोर्ट-कचेरीशी संबंधित बाबीत निर्णय आपल्या बाजूनं लागेल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी आव्हानात्मक आहे. एखाद्या गोष्टीमुळं प्रेमिकेचा गैरसमज होण्याची संभावना आहे. कोणत्याही समस्येचे विवादाऐवजी संवाद साधून निराकरण करावं. तसेच कोणताही निर्णय भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात घेऊ नये, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी त्रस्त करू शकते.

कर्क: आपण जर ह्या पूर्वी एखाद्या योजनेत किंवा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात आपणास अपेक्षित लाभ प्राप्त होईल. आपण जर एखाद्या मोठ्या प्रकल्पाचा सौदा करू इच्छित असाल तर ह्या आठवड्यात प्रयत्न केल्यास त्यात सुद्धा आपण यशस्वी व्हाल. कारकिर्दी किंवा व्यवसायानिमीत्त केलेले प्रवास सुखद व यशस्वी होतील. ज्या व्यक्ती परदेशात आपली कारकीर्द घडवू इच्छित असतील त्यांना यश प्राप्त होईल. ह्या दरम्यान परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा आपणास अनुकूल आहे. कदाचित आपल्या प्रेमास मान्यता देऊन कुटुंबीय आपल्या विवाहावर शिक्कामोर्तब करतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो. कुटुंबियांसह सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

सिंह :आपण निश्चित केलेले काम वेळेवर पूर्ण होईल. आठवड्याच्या सुरूवातीस अपेक्षित पदोन्नतीची किंवा बदलीची इच्छा पूर्ण होऊ शकते. आपणास आपल्या कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. ह्या कामात आपणास आपल्या मित्रांची मदत होईल. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल. विशेषतः वडील आपल्या पाठीशी उभे राहतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आपला बहुतांश वेळ धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीत जाईल. ह्या दरम्यान आपणास एखादा मोठा सन्मान सुद्धा मिळू शकतो. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा अनुकूल आहे. जर प्रेमिकेचा एखादा गैरसमज झाला असेल तर ह्या आठवड्यात तो दूर होऊन प्रेम संबंध पूर्ववत होतील. एकंदरीत प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखावह होईल.

कन्या: ह्या आठवड्याची सुरवात एखादी अडचण दूर होण्याबरोबर होईल. आठवड्याचा पूर्वार्ध आपल्यासाठी अत्यंत अनुकूल व शुभ आहे. ह्या दरम्यान कार्यक्षेत्री वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे खूप सहकार्य मिळेल. आपला निव्वळ कार्यक्षेत्रीच नव्हे तर कुटुंबात व समाजात मान-सन्मान उंचावेल. आठवड्याच्या उत्तरार्धात धर्म व अध्यात्माप्रति आपली रुची वाढेल. ह्या दरम्यान एखादी तीर्थ यात्रा सुद्धा संभवते. ह्या आठवड्यात ऋतुजन्य किंवा जुनाट आजार आपल्या शरीरास कष्टदायी होण्यास कारणीभूत ठरू शकेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा सामान्य आहे. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात प्रेमिकेचे पूर्ण सहकार्य मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल.

तूळ: ह्या आठवड्यात मित्रांच्या सहकार्याने कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक संधी तर प्राप्त होतीलच, परंतु असे करत असताना आपली प्रकृती व वेळेचा अभाव आडवा येईल. प्रकृतीशी संबंधित कोणतीही बेपर्वाई आपणास रुग्णालयात दाखल होण्याची सक्ती करू शकते. आठवड्याच्या मध्यास जमीन-जुमल्याशी संबंधित विवाद आपल्या चिंतेस कारणीभूत होण्याची संभावना आहे. असं असलं तरी आपली हि समस्या दूर करण्यात आपल्या वैवाहिक जोडीदाराची खूप मदत होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे उभा राहील. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी काहीसा त्रासदायी असणार आहे. प्रेमिकेमुळे कुटुंबियांशी वाद संभवतो. आपल्या माणसांची साथ न मिळाल्याने आपण स्वतःला एकटे समजू लागाल. अशा वेळी समस्येतून बाहेर पडण्यासाठी धैर्य व विवेक बाळगावा.

वृश्चिक : ह्या आठवड्यात आपणास नशिबाची साथ मिळणार आहे. जीवनाशी संबंधित कोणत्याही आव्हानांना धीटपणे सामोरे जात असताना आपण प्रत्येक समस्येचे निराकरण आपल्या विवेक बुद्धीने करण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याचा पूर्वार्ध परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ फले प्राप्त करून देणारा आहे. सत्ता व शासनाशी संबंधित मोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची मनीषा पूर्ण होईल. कोर्ट-कचेरीशी संबंधितबाबीत मोठे यश प्राप्त होईल. विरोधक स्वतःहून समझोता करण्यास पुढे येतील. ह्या दरम्यान आपले विरोधक आपल्या योजनेत अडथळा आणण्याचा किंवा आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्रेमिकेकडून आपणास एखादी भेटवस्तू मिळू शकते. विवाहेच्छूकांचे विवाह ठरण्याची संभावना आहे. दांपत्य जीवन सुखद होईल.

धनु : ह्या आठवड्यात आपणास आळस व अहंकार बाजूस ठेवावा लागेल. आठवड्याचा पूर्वार्ध आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. ह्या दरम्यान आपल्या द्वारा कोणतेही कार्य मन लावून करण्यात नक्कीच यश प्राप्त होईल. आपणास आपले ध्येय साध्य करण्यात मित्रांचे व कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आपण जर एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असाल तर त्याच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी आपणास प्राप्त होईल. प्रणयी जीवनात प्रगल्भता येण्यासाठी आपणास आपल्या प्रेमिकेच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ आपल्या वैवाहिक जोडीदारास जरूर द्या. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. तसेच आहार व दीनचर्येवर नियंत्रण ठेवावे.

मकर :हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत व्यस्त राहण्याचा आहे. ज्या व्यक्ती आपल्या व्यापार वृद्धीचा विचार करत आहेत त्यांची इच्छा ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. कमीशन तत्वावर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आपण अनेक दिवसांपासून जमीन, घर किंवा वाहन घेण्याच्या विचारात असाल तर ह्या आठवड्यात आपली मनोकामना पूर्णत्वास जाऊ शकते. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात जाईल. ह्या दरम्यान व्यवसायासंबंधी कोणताही निर्णय उत्साहाच्या भरात घेऊ नका, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आपसातील विश्वास वाढण्यासाठी प्रेमिकेच्या लहान - सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कोणत्याही समस्येचे निराकरण करताना तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्याऐवजी आपसात चर्चा करणे हितावह होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. वैवाहिक जोडीदार पदोपदी आपणास सहकार्य करेल.

कुंभ: ह्या आठवड्यात आपल्यात आपली कामे अचूक व वेळेवर पूर्ण होण्यासाठी एक आगळी-वेगळी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण होईल. कार्यक्षेत्री वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. सत्ता किंवा शासनाशी संबंधित व्यक्तींना एखादी महत्वाची जवाबदारी मिळू शकते. आपण जर अनेक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असाल तर ह्या आठवड्यात आपणास त्यासाठी चांगली संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांना हा आठवडा लाभदायी आहे. त्यांना उत्तम धनलाभ होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात सुख-सुविधेशी संबंधित वस्तूंची खरेदी किंवा घर दुरुस्तीसाठी पैसा खर्च होऊ शकतो. ह्या आठवड्यात प्रेमिकेची भेट न झाल्यानं किंवा एखाद्या गोष्टीने मतभेद झाल्याने आपले मन खिन्न होईल. अर्थात हि समस्या दूर करण्यात आपला एखादा मित्र मदत करेल. वैवाहिक जीवन सुखद होईल.

मीन: आठवड्याची सुरवात कार्यक्षेत्राशी किंवा व्यवसायाशी संबंधित मोठी यश प्राप्ती आपल्या व कुटुंबियांच्या आनंदास कारणीभूत ठरेल. योग्यवेळी घेतलेला योग्य निर्णय धनलाभ व आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरेल. कला, संगीत व पत्रकारितेशी संबंधित व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आपण जर अनेक दिवसांपासून व्यवसाय वृद्धीचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. कोर्ट-कचेरीशी संबंधित बाबीत निर्णय आपल्या बाजूने होऊ शकतो. वरिष्ठांच्या मध्यस्थीने सर्व आरोप-प्रत्यारोप दूर होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबियांसह दूरवरच्या किंवा जवळच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आपसातील विश्वास वाढेल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील.

हेही वाचा -

नोकरी, कौटुंबिक जीवनासह संपत्ती मिळविण्यात यश मिळेल का? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ABOUT THE AUTHOR

...view details