महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा सप्ताह, वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशी भविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 6:01 AM IST

Weekly Horoscope मेष: या आठवड्यात व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांची कामे पूर्ण करावी लागतील. नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येईल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. त्यांच्यासह एखाद्या धार्मिक यात्रेस जाल. तेथे गेल्यानं सर्वजण खुश होतील. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी कराल. आपणास अभ्यासात मदत करू शकतील असे मित्र बनवावे लागतील. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आपण त्यांच्या कामात मदत कराल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे आयोजन सुद्धा कराल. आपणास प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. मातेचे सानिध्य लाभेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. परदेशातून शिक्षण प्राप्त करण्याची संधी सुद्धा मिळेल.

वृषभ : या आठवड्यात कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत करतील. ज्यांना उच्च शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना मन लावून अध्ययन करावं लागेल, अन्यथा त्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाहीत. आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापारी व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आपल्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं दिसून येईल. संपत्तीचा लाभ होऊ शकतो. सरकारी क्षेत्रातून सुद्धा लाभ संभवतो. आपल्या वैवाहिक जोडीदारास आपण एखादे नवीन काम सुरु करून देऊ शकाल. माता-पित्याचे सानिध्य आणि सहकार्य मिळेल.

मिथुन :याआठवड्यात नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. व्यापारी त्यांच्या व्यापाराचा विस्तार करण्यात यशस्वी होतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी रोजच्या दिनचर्ये प्रमाणे अध्ययन करत असल्याचं दिसून येईल. या आठवड्यात आपली प्रकृती ठीक राहील. आपल्या शरीरास विश्रांती मिळू शकेल अशा प्रवृत्तीकडं आपणास लक्ष द्यावं लागेल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. कुटुंबियांकडून धनलाभ संभवतो. प्रवासाची संधी सुद्धा मिळू शकते. हे प्रवास आपल्यासाठी सुखावह होतील. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. भावंडांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. एखाद्या दूरस्थ नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. मुलास चांगली नोकरी लागल्याने माता-पिता अत्यंत खुश होतील. स्वतःच्या मुलाचा अभिमान वाटेल.

कर्क : या आठवड्यात आर्थिक बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक आणि घरगुती खर्च होतच राहतील. रोजची प्राप्ती उत्तम असेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या जीवनात चांगले नाते असल्याची जाणीव होईल. आपले प्रणयी जीवन सुखावह होईल. आपण आपल्या प्रेमिकेसह दूरवर फिरावयास जाल आणि एकमेकांना भेटवस्तू सुद्धा द्याल. आपल्या कारकिर्दीत एखादी समस्या निर्माण झाली तरी आपण त्यास सहजपणे सामोरे जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यकौशल्यामुळं लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न करतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपली प्रकृती उत्तम राहिली तरी बदलत्या ऋतुमानामुळं त्यात चढ-उतार होत असल्याचं जाणवेल. घरात पूजा-पाठाचं आयोजन होईल. सर्वजण एकजुटीनं कार्य करत असल्याचं दिसून येईल.

सिंह : या आठवड्यात आपण मित्रांच्या सहवासात थोडा वेळ व्यतीत कराल. आपल्या सुख-दुःखाची देवाण-घेवाण करत असल्याचं दिसून येईल. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदारासह आनंदाचे क्षण व्यतीत कराल. विवाहेच्छुकांच्या विवाह प्रस्तावावर शिक्का मोर्तब होईल. आपले प्रणयी जीवन सुखावह होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. वरिष्ठ त्यांच्या कामाचे कौतुक करतील. आपणास व्यापारात यश प्राप्त होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी मेहनत करत असल्याचे दिसेल. त्यामुळं त्यांना अपेक्षित परिणाम मिळेल. आपली प्रकृती पूर्वी पेक्षा चांगली राहिली तरी ऋतुमानातील बदलामुळं प्रकृतीत चढ-उतार होऊ शकतात. आपल्यावर वडीलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. अशा प्रसंगी घरी लोकांची ये-जा होईल. मातेचे सानिध्य मिळेल.

कन्या : या आठवड्यात विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासह दूरवरच्या प्रवासास जातील. तेथे एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. आपले प्रणयी जीवन उत्तमच असेल. कुटुंबीय एकत्रितपणे एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे आयोजन करतील. जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत ते घराच्या आठवणीनं त्रस्त होतील. विद्यार्थी अभ्यासाच्या जोडीनं एखाद्या इतर प्रवृत्तीत सुद्धा सहभागी होतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. व्यावसायिकांच्या व्यवसाय पुढे नेताना नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांची त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. माता-पित्याचं सानिध्य आणि सहकार्य मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. मुलांच्या भवितव्यासाठी माता-पिता आर्थिक गुंतवणूक करतील.

तूळ : या आठवड्यात व्यापाऱ्यांना व्यापारवृद्धीची संधी मिळेल. नवीन ओळखी सुद्धा होतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचं संकेत आहेत. आपली थकबाकी मिळेल. आपण आपली खोळंबलेली सर्व कामे पूर्ण करू शकाल. हा आठवडा कर्ज घेण्यासाठी अनुकूल आहे. जमीन - जुमल्यात सुद्धा आपण गुंतवणूक करू शकता. वडील्याच्या संपत्तीतून धनलाभ संभवतो. वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा उत्तम आहे. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. माता-पित्यां जवळ आपण आपल्या मनातील विचार बोलून दाखवाल. घरात पूजा-पाठाचं आयोजन होईल. नोकरीच्या बरोबरीने एखादा जोड व्यवसाय करण्याचा निर्णय सुद्धा आपण घ्याल.

वृश्चिक : या आठवड्यात आपणास वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. त्यांच्या सहकार्यामुळं आपण आपली प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांशी करून देऊ शकता. आपल्या विवाह प्रस्तावावर शिक्का मोर्तब होईल. एखाद्या नातेवाईकाशी भांडण संभवते. वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळेल. एकमेकांच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत कराल. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात सुद्धा जाऊ शकतात. आपली प्रकृती चांगली राहील. आपल्या दिनचर्येत सकाळचे फिरणं, योगासन आणि ध्यान-धारणेस समाविष्ट करणं हितावह होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात काही बदल करतील. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण जर एखादी गुंतवणूक केली असेल तर त्यातून सुद्धा चांगला लाभ होईल. मनःशांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावं.

धनु: हा आठवडा प्रेमीजनांसाठी उत्तम आहे. कोणत्याही मोठ्या बदलाची अपेक्षा बाळगू नये. वैवाहिक जोडीदाराशी आपल्या मनातील व्यथांवर चर्चा जरूर करा. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल. हि जबाबदारी आपण जरूर पूर्ण करू शकाल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपल्या दैनिक प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. व्यापारी व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी होतील. विद्यार्थी स्पर्धेसाठी खूप मेहनत करत असल्याचं दिसेल. आपली प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली राहील. मनःशांतीसाठी आपण थोडा वेळ धार्मिक कार्यात सुद्धा व्यतीत कराल.

मकर: या आठवड्यात आपणास आपल्या प्रेमिकेचं सहकार्य मिळेल. तिच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाल. जीवनात आनंदाचं वातावरण राहील. एखाद्या मित्राच्या भेटीनं आपण खूप आनंदित झाल्याचं दिसून येईल. आपली आर्थिक स्थिती ठीक राहील. आपल्या खर्चात वाढ होईल. हे खर्च आपण टाळू शकणार नाहीत. आपण आपणास प्रिय असलेल्या व्यक्तींसाठी काही वस्तू खरेदी कराल. नोकरीच्या ठिकाणी आपणास सावध राहावं लागेल. कोणाशीही वाद घालू नका. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाकडं लक्ष द्यावं लागेल. असं केल्यास ते व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी होऊ शकतील. आपल्या अभ्यासातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा. असं केल्यानं आपण परीक्षेत यशस्वी होऊ शकाल. आपला वेळ वाया घालतील अशा मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न सुद्धा करावा. आपली प्रकृती चांगली राहील. बाहेरील पदार्थ खाणं टाळा.

कुंभ :याआठवड्यात आपण कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचं आयोजन कराल. आपण आपला जास्तीत जास्त वेळ प्रेमिकेच्या सहवासात घालवाल, आणि त्यामुळं आपण कुटुंबियांना आवश्यक तितका वेळ देऊ शकणार नाहीत. विवाहित व्यक्ती स्वतःच्या जोडीदारावर शंका घेण्याची संभावना आहे. अशा वेळी बसून चर्चा करणं हितावह राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आपण जमिनीत गुतंवणूक करू शकता. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. आपण आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित कराल, आणि त्यामुळं आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची नोकरीत प्रगती होईल. व्यापारी व्यवसायवृद्धी करण्यात यशस्वी होतील. आपली प्रकृती उत्तम राहील.

मीन : या आठवड्याची सुरवात आपल्या संबंधांसाठी उत्तम आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. प्रणयी जीवनात आपण जागरूक राहाल. आपण आपल्या प्रेमिकेसह दूरवरचा प्रवास सुद्धा करू शकता. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. आपल्या अध्ययनात काही विघ्न सुद्धा येऊ शकतात. आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांच्या हाती एखादा मोठा सौदा लागू शकतो. त्यामुळं व्यापारात चांगला लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. या आठवड्यात आपणास आपल्या कामावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण जर भागीदारीत एखादा व्यवसाय करत असाल तर आपल्या भागीदाराशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. हा आठवडा प्रकृतीच्या बाबतीत काहीसा नाजूक असल्यानं आपण आरोग्याची काळजी घ्यावी.

हेही वाचा -

  1. राशीभविष्य : आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा राशी भविष्य - Horoscope 2024
  2. 30 मार्च 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Panchang 2024

ABOUT THE AUTHOR

...view details