मेष: हा आठवडा आपल्यासाठी उन्नतीदायक आणि लाभदायक असू शकतो. आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी आपणास मोठ्या अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु आपल्या प्रतिबद्धतेने त्यात आपण यशस्वी होऊ शकता. आपणास धीर धरावा लागेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या स्थितीचा अंदाज घ्यावयास हवा. असमंजस स्थितीत आपण घाई करू नये. ह्या उलट हळू-हळू आणि सामंजस्याने त्यात पुढील वाटचाल करावी. हा आठवडा प्रकृतीस सामान्यच आहे. मात्र, आपणास आपल्या आहार-विहारावर लक्ष ठेवावं लागेल. आपली प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी आपण एखाद्या नवीन तंत्राचा किंवा उपायांचा वापर करू शकता, जे आपणास जास्त लाभदायी होऊ शकेल. आपले प्रेमसंबंध दृढ होतील. आपलं मन प्रसन्न राहील. कुटुंबियांची मदत आपणास समर्थन प्रदान करेल. कार्यक्षेत्री काही काळासाठी थोडा संघर्ष होऊ शकतो, परंतु त्यानंतर आपले कार्य संपन्न होण्याची संभावना आहे.
वृषभ : ह्या आठवड्यात आपणास विविध आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आपणास धैर्य आणि चोख व्यवहार करण्याची आवश्यकता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. संवाद साधताना सतर्क राहा. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची संभावना असल्यानं आपल्या संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात सुद्धा संघर्षानंतरच लाभ प्राप्त होऊ शकतो. आपणास नवीन गुंतवणूक करण्याची किंवा व्यावसायिक संबंध जोडण्याची संधी मिळू शकते. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची शकता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययनाकडं विशेष लक्ष देऊन अभ्यास करावा. प्रणयी जीवनात मागील काही दिवसांपासून आलेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न करून प्रेमसंबंध दृढ करावे. आपल्या वैवाहिक जोडीदारासह दूरवरचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळं आपल्या नात्यात गोडवा येईल. आईच्या प्रकृतीने चिंतीत होण्याऐवजी तिच्यावर प्रेम करा आणि तिचे समर्थन करा. ह्या आठवड्यात मुलांना एखादे मोठे यश मिळण्याची शकता आहे. त्यामुळं आपल्या मान-सन्मानात वाढ होईल.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी काही अडचणी आणि आव्हाने घेऊन येत आहे. कार्यक्षेत्री थकवा आणि कामाचा भार असल्याचं जाणवू लागल्यानं मन बेचैन होऊन काम करण्यास त्रास होऊ शकतो. आपलं लक्ष गाठण्यास त्रास होऊ शकतो. आर्थिक समस्यांचं निराकरण आठवड्याच्या सुरूवातीस करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जमीन, घर किंवा वाहन ह्यांच्या खरेदी-विक्री करण्यास थोडा विलंब होऊ शकतो. आहारावर लक्ष द्या. पोटाचे विकार संभवत असल्यानं पौष्टिक आहार घेण्याची आणि व्यायाम करण्याची गरज आहे. प्रणयी जीवनात वाद संभवतात. अशा प्रसंगी प्रेमिकेस एखादी भेटवस्तू देऊन खुश करू शकाल. वैवाहिक जीवनातील सामंजस्य आणि प्रेम टिकून राहील. मुलांप्रती सुद्धा सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यातील आव्हानांना सामोरे जाताना डोके शांत ठेवण्याची आणि समस्यांचं निराकरण करताना सक्रिय राहण्याची गरज आहे.
कर्क : ह्या आठवड्यात आपणास विशेष लक्ष द्यावं लागेल. आपल्या कामात विघ्न आणणाऱ्या व्यक्तींपासून आपणास अंतर ठेवावं लागेल, जेणेकरून कार्यक्षेत्री आपली कामे निर्विघ्नपणे पार पडू शकतील. ह्या आठवड्यात कामानिमित्त प्रवासाचे आयोजन संभवते. तेव्हा त्यासाठी सुद्धा सावध राहावं. प्रणयी जीवनात सावध राहून मार्गक्रमण करावे. कोणत्याही प्रकारे गैरसमज होऊन समाजात बदनामी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याशी सामंजस्य निर्माण करून आपल्या कार्यक्षेत्री होत असलेल्या त्रासांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. घर-जमीन ह्यांच्याशी संबंधित वाद जर कोर्टाच्या बाहेर सोडवायची संभावना असली तर आपणास अनुकूल न्याय मिळू शकेल ह्याकडं लक्ष द्यावं. ह्या आठवड्यात संघर्ष करून आणि सावधपणे पाऊल उचलून आपण आपलं लक्ष गाठण्यात यशस्वी होऊ शकाल.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी सौभाग्य घेऊन येत आहे. युवकांची संगीत, कला, नृत्य इत्यादीतील गोडी वाढेल. ह्या आठवड्यात आपण बराचसा वेळ मित्रांसह मौज-मजा करण्यात घालवाल. जमीन, घर किंवा वाहन इत्यादींच्या खरेदी-विक्रीची मनोकामना पूर्ण होऊ शकेल. आई- वडीलांकडून सहकार्य प्राप्त होईल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. आपल्या प्रेम संबंधांचे रूपांतर विवाहात होऊ शकते. आपले कुटुंबीय आपल्या प्रेम संबंधाचा स्वीकार करतील. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह आपण एखाद्या सहलीच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. परीक्षा- स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरेल. आपणास एखादी चांगली बातमी ऐकिवात येण्याची संभावना आहे. आपणास मुलांचं सहकार्य प्राप्त होईल.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा धावपळीचा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कामानिमित्त जवळचे किंवा लांबचे प्रवास करावे लागू शकतात. आर्थिक बाबतीत योजनाबद्ध कार्य करणे लाभदायी होईल. विद्यार्थाना अभ्यासाचा कंटाळा येण्याची संभावना असल्यानं त्यांना त्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. प्रेमसंबंधात स्वतःशी आणि प्रेमिकेशी प्रामाणिक राहिल्यास प्रणयी जीवन सुखद होईल. एकाचवेळी दोन जणींशी संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात आपणास मोठ्या संकटास सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात प्रेमळ वाद झाले तरी दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल, अन्यथा पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. व्यापारात अपेक्षित लाभ न झाल्यानं मन हताश होऊ शकते. परंतु सकारात्मक चिंतन करूनच प्रगती होत असते ह्याची जाणीव आपणास ठेवावी लागेल. ह्या आठवड्यात सतर्क राहून समस्यांचा सामना केल्यास आपण यशस्वी व्हाल.
तूळ : हा आठवडा आपल्यासाठी काही समस्या घेऊन येऊ शकतो. परंतु धैर्य आणि समर्थनासह आपण त्यांचा सामना करू शकाल. कामात थोडा त्रास होऊ शकतो, परंतु तो दीर्घकाळ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. धीर धरून आणि कुटुंबियांच्या सहकार्याने आपण त्यातून बाहेर पडावे. आठवड्याच्या मध्यापर्यंत गोष्टी आपल्या बाजूनं परावर्तित होण्याचे संकेत आहेत. त्यात आपणास समर्थन आणि मदत मिळू लागेल. धीर धरा आणि मोठा निर्णय घेण्यासाठी कुटुंबियांशी चर्चा करून सहमती मिळवा. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक ठिकाणचा प्रवास होण्याची संभावना आहे. हा प्रवास आपल्या आत्म्यास शांती आणि सकारात्मकता प्रदान करू शकेल. प्रेम संबंधातील प्रगल्भता आणि प्रेमिकेशी उत्तम समन्वय, ह्या दोन कारणाने आपले प्रेमसंबंध दृढ होऊन आपण आनंदित व्हाल. व्यापारात आपण यशस्वी व्हाल. तसेच व्यापारवृद्धी करण्यात सुद्धा आपण यशस्वी व्हाल.