महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या लोकांनी राहावे सावध, सर्तकतेने करा काम; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 12:10 AM IST

  • मेष (Aries) :या आठवड्याच्या पूर्वार्धाहून उत्तरार्ध अधिक लाभदायी आहे. अनेक अडथळे आणि समस्या येऊन सुद्धा आपली कामे पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रेम संबंध दृढ होतील. आपली मधुर वाणी आपली स्थगित कामे पूर्ण करण्यास मदतरूप ठरेल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीनं सामान्यच आहे. ह्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या परिस्थितीचा विचार अवश्य करावा. आठवड्याच्या मध्यास कार्यक्षेत्री संघर्षानंतरच कार्य सिद्धी होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबियांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. ईश्वर साधना-आराधना व त्यांच्या प्रति विश्वास आणि आस्था वाढेल. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या दबावास बळी पडून एखादा निर्णय घेणे टाळावे.
  • वृषभ (Taurus) : या आठवड्यात घरात किंवा बाहेर लहान-सहान गोष्टींची तुलना करणे टाळावे. रागात येऊन कोणास अपशब्द बोलणे टाळावे. संपत्तीची खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होऊ शकते. व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्ती होईल. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे मिळू लागेल. जर प्रेमिकेशी कोणत्याही प्रकारे कटुता निर्माण झाली असेल तर प्रयत्न केल्यास सर्व गैरसमज दूर होऊन आपले प्रणयी जीवन पुन्हा बहरू लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात दूरवरचा एखादा प्रवास संभवतो. आईच्या प्रकृतीमुळं मन काहीसे चिंतीत होऊ शकते. परीक्षा-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धापर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित किंवा वयस्कर व्यक्तीच्या मदतीने जमीन-जुमल्याशी संबंधित वादाचे निराकरण होऊ शकेल.
  • मिथुन (Gemini) : या आठवड्यात आपली जीवनाची गाडी संथ गतीने पुढे जात असल्याचं जाणवेल. अपेक्षित कामे वेळेवर न झाल्यानं मन बेचैन होईल. कार्यक्षेत्री कामाचा भार राहील. ह्या आठवड्यात इतरांवर बिलकुल अवलंबून राहू नका, अन्यथा वेळेवर मदत न मिळाल्यानं आपली निराशा होईल. अशावेळी आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करा. जर आपल्या प्रणयी जीवनात काही रुसवे-फुगवे झाले असतील तर प्रेमिकेस एखादी चांगली भेटवस्तू देऊन तिची समजूत काढू शकता. पती-पत्नी दरम्यान प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील. मुलांच्या खुशीसाठी थोडा जास्त पैसा खर्च करावा लागू शकतो. आहारावर विशेष लक्ष द्यावं. पोटाचे विकार संभवतात. जर आपणास एखादी आर्थिक समस्या असली तर आठवड्याच्या पूर्वार्धात ती दूर करण्याचा प्रयत्न करा. घर, वाहन यांच्या खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर तो तूर्तास स्थगित ठेवू शकता.
  • कर्क (Cancer) :आपल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून ह्या आठवड्यात योग्य तितके अंतर ठेवणं हितावह होईल. प्रेम संबंधात सावध राहून पाऊल उचलणे हितावह होईल. कोणत्याही प्रकारे अति उत्साहित होऊ नका, अन्यथा सामाजिक बदनामी होऊ शकते. आठवड्याच्या सुरूवातीस कामानिमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास करावे लागू शकतात. ह्या आठवड्यात आपली परिस्थिती बघूनच एखादी मोठी जबाबदारी घेण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा नंतर आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात वरिष्ठांच्या मदतीने कार्यक्षेत्री येणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्याची संभावना आहे. हा आठवडा प्रकृतीच्या बाबतीत मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं मन चिंतीत होऊ शकते.
  • सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी शुभत्व आणि सौभाग्य घेऊन येणारा आहे. कारकीर्दीस आणि व्यवसायास प्रगती पथावर घेऊन जाण्याचे अपेक्षित स्वप्न पूर्ण होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. आपले प्रेम संबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात. कुटुंबीय आपल्या प्रेम संबंधाचा स्वीकार करतील. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. युवकांची संगीत, कला, नृत्य इत्यादीत रुची वाढेल. जमीन, घर, वाहन इत्यादींच्या खरेदी - विक्रीची मनोकामना ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. माता-पित्यांकडून स्नेह आणि सहकार्य प्राप्त होईल. परीक्षेची - स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आठवडा भाग्याचा असल्याचं जाणवेल. एखादी चांगली बातमी ऐकावयास मिळू शकते. मुलांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या सहवासात मौज-मजा करण्यात वेळ जाईल.
  • कन्या (Virgo) :हा आठवडा आपल्यासाठी काहीसा धावपळीचा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कामानिमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास करावे लागू शकतात. प्रणयी जीवनात स्वतःशी व प्रेमिकेशी प्रामाणिक राहा. दोन ठिकाणी पाय ठेवल्यास आपणास मोठ्या त्रासास सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जोडीदाराशी प्रेमळ वाद होऊन सुद्धा दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कार्यक्षेत्री कामाचा भार राहील. आपले लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांची व कनिष्ठांची मदत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत योजनाबद्ध काम करणे लाभदायी होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. व्यापारात अपेक्षित लाभ न मिळाल्याने निराशेची भावना उत्पन्न होईल. परंतु सकारात्मक चिंतन करूनच उन्नती व प्रगती होते हे लक्षात ठेवावे. आहारावर विशेष लक्ष द्यावं, अन्यथा पोटाचे विकार होण्याची संभावना आहे.
  • तूळ (Libra) : अनेक दिवसांपासून आपण जर एखादे पद किंवा सन्मान प्राप्तीची प्रतीक्षा करत असाल तर कदाचित ह्या आठवड्यात आपली हि मनोकामना पूर्ण होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठांची आपल्यावर कृपादृष्टी असेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा लागेल. आपल्या प्रेमिकेच्या व्यक्तिगत आयुष्यात जरुरी पेक्षा जास्त हस्तक्षेप करणे टाळावे. वैवाहिक जीवनातील सुख-सहकार्य टिकून राहील. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. अध्ययना प्रति त्यांची गोडी वाढेल. खरेदी-विक्रीशी संबंधित बाबीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. एखाद्या दूरवरच्या ठिकाणी संपत्तीची खरेदी होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक किंवा सामाजिक कार्यात व्यस्त राहावे लागेल. कुटुंबातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून एखादी मोठी भेटवस्तू मिळू शकते. प्रकृती सामान्यच राहील.
  • वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आणि लाभदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आर्थिक बाबतीत आपणास मोठे यश प्राप्त होईल. अनपेक्षितपणे आपणास व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. वैवाहिक जोडीदाराची प्रगती आपल्या आनंदास कारणीभूत ठरेल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहतील. मित्रांच्या माध्यमातून सामान्य लाभ होण्याची संभावना आहे. सुख-सुविधेशी संबंधित वस्तूंसाठी सढळहस्ते पैसा खर्च कराल. हा आठवडा पूर्णतः आपल्यासाठी लाभदायी आणि उन्नतिकारक आहे. प्रकृतीच्यादृष्टीनं हा आठवडा चांगला आहे. आर्थिक स्थिती सबळ करण्यासाठी योजनाबद्ध काम करावे लागेल. धनलाभासह खर्च वाढण्याची सुद्धा संभावना आहे.
  • धनु (Sagittarius) :या आठवड्यात कोणत्याही क्षेत्रात विचारपूर्वक आपले पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान-सहान बाबी दुर्लक्षित करा, अन्यथा नंतर आपणास पश्चातापास सामोरे जावे लागू शकते. आर्थिक क्षेत्रात विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करा. कोणाच्या प्रलोभनास बळी पडण्याऐवजी आपल्या विवेक बुद्धीने योग्य चिंतन करून मगच एखादा मोठा निर्णय घ्यावा. जर आपण कुटुंबा संबंधी एखादा मोठा निर्णय घेणार असाल तर सर्व लहान-थोरांचा सल्ला घेणे हितावह होईल. विशेषतः संपत्तीशी संबंधित वादाचे निराकरण करताना हि बाब लक्षात ठेवावी. आपल्या सख्या भावंडांशी चांगले संबंध ठेवा. प्रेम संबंधात सावकाश पाऊल पुढे टाकणे हितावह होईल, अन्यथा होऊ घातलेले संबंध बिघडू शकतात. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. आपल्या अडचणीच्या काळात जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे राहील.
  • मकर (Capricorn) : आपल्यामुळेच कामे होतील किंवा बिघडतील हे आपणास ह्या आठवड्यात लक्षात ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात आपणास आपले कार्य पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त परिश्रम करावे लागतील. वेळेवर मित्र आणि सहकाऱ्यांची मदत न मिळाल्यानं मन काहीसे उदास व त्रस्त होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या परिस्थितीनुसार महत्वाच्या कार्यात निर्णय घ्यावे लागतील. प्रेमसंबंध दृढ होण्यासाठी आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. कौटुंबिक जवाबदाऱ्यांकडे पाठ फिरविल्यास आपल्या दांपत्य जीवनात कलह निर्माण होऊ शकतो. अति भावनाशील होऊ नका. व्यापारात कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याची चूक करू नका. आठवड्याच्या अखेरीस कामानिमित्त दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. प्रकृती संबंधी त्रास उदभवू शकतो.
  • कुंभ (Aquarius) :या आठवड्यात कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणतीही जोखीम घेऊ नये. जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर असे करण्यापूर्वी खूप विचार करावा. आपल्या गरजा वाढू देऊ नका, अन्यथा आपणास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कर्ज घेण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. इतरांशी थट्टा-मस्करी करताना आपणास आपल्या मान-प्रतिष्ठेकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. आपले हास्य उपहासात रूपांतरित होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा अनेक वर्षांपासुन असलेले संबंध एका झटक्यात तुटू शकतात. जमीन-घर ह्यांची खरेदी-विक्री करताना अधिक सावध राहावं, तसेच कागदपत्र नीट वाचून व समजून घेऊन मगच त्यावर हस्ताक्षर करावे. आयुष्यातील चढ- उतारादरम्यान आपल्या माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळत राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. प्रेम प्रसंगात खूपच सावध राहून वाटचाल करावी लागेल. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी आपल्या वैवाहिक जोडीदारास वेळ देऊन त्यांच्या भावनांचा आदर करावा.
  • मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आणि यशदायी आहे. आपण केलेल्या बहुतांशी प्रयत्नात आपणास यश व लाभ प्राप्त होईल. कारकिर्दीत व व्यवसायात उन्नती संभवते. मित्रांबरोबर योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास अपेक्षित लाभ होईल. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह दूरवरचा प्रवास सुद्धा करू शकता. नवीन जमीन किंवा घर घेण्याची संधी मिळेल. प्रकृतीच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच आहे. घरात एखादे धार्मिक किंवा मांगलिक कार्याचे आयोजन संभवते. भावंडांसह वेळ घालविण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात हसत - खेळत वेळ जाईल. कुटुंबात सुख आणि सौहार्द वाढेल. माता-पित्यांशी सुख सामंजस्य टिकून राहील.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details